काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट!
By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 1, 2020 19:47 IST2020-12-01T19:45:13+5:302020-12-01T19:47:42+5:30
एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली.

काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट!
कोलकाता - असे कधी होऊ शकते का, की एखाद्या विमानावरच मधमाशांनी हल्ला केला? मात्र, असे झाले आहे. टीओआय ने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता येथील विस्तारा एअरलाईनच्या दोन विमानांसोबत असे झाले. या विमानावर मधमाशा एऊन बसल्या. एवढेच नाही, तर त्यांनी खिडकीचा भाग पूर्णपणे व्यापून टाकला होता.
विमानाला एक तास उशीर -
एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली. या विमानावर एवढ्या मधमाशा जमा झाल्या होत्या, की त्यांना हटवण्यासाठी बराच वेळ गेला आणि मेहनतही करावी लागली.
वॉटर जेट स्प्रेचा वापर -
या विमानावर मोठ्या प्रमाणावर मधमाशा बसल्या होत्या. यांना हटविण्यासाठी अक्षरशः वॉटर जेट स्प्रेचा वापर करण्यात आला. यामुळे जे विमान सायंकाळी 5:30 वाजता निघणार होते त्याला उशीर झाला आणि ते 6:30 वाजता टेकऑफ झाले.
दुसऱ्या दिवशीही अशीच घटना -
येथे दुसऱ्या दिवशीही पुन्हा अशीच घटना पाहायला मिळाली. यावेळीही विस्ताराचे ग्राउंड स्टॉफ कर्मचारी हैराण झाले. अखेर, पुन्हा वॉटर जेटच्या मदतीने या मधमाशांना काढण्यात आले. हे विमान पोर्ट ब्लेअर येथे जाणार होते. याची वेळ होती. 10:30. मात्र, हे विमानही एक तास लेट झाले आणि 11:30ला निघाले.
काही पायलट मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, जोवर मधमाशा दूर होत नाहीत, तोवर पायलट विमान उडवू शकत नाही. यामुळे एखाद्यावेळी मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Looks like honey pancakes inside 🧇
— Tarun Shukla (@shukla_tarun) November 30, 2020
Kolkata yesterday. @airvistara 🛫 pic.twitter.com/Pu7ydGt8bY
कसल्याही प्रकारचे पोळ नाही -
कोलकाता एअरपोर्टचे डायरेक्टर कौशिक भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा घटना सातत्याने वाढत आहेत. मधमाशांनी एखादे पोळ तर तयार केले नाही, याची पाहणी एअरपोर्ट ग्राउंड आणि टर्मिनल बिल्डिंगमध्ये केली जात आहे. मात्र, अद्याप कुठल्याही प्रकारचे पोळ आढळून आलेले नाही. या स्थलांतर करणाऱ्या मधमाशा असाव्यात अशी शक्यताही वर्तवली जात आहे.