अरे बापरे ! पती हॅण्डसम नाही म्हणून केली हत्या
By Admin | Updated: April 12, 2017 12:30 IST2017-04-12T12:30:53+5:302017-04-12T12:30:53+5:30
फक्त आणि फक्त आपला पती दिसायला देखणा नाही या कारणामुळे एका महिलेने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

अरे बापरे ! पती हॅण्डसम नाही म्हणून केली हत्या
>ऑनलाइन लोकमत
कुड्डालोर, दि. 12 - फक्त आणि फक्त आपला पती दिसायला देखणा नाही या कारणामुळे एका महिलेने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती देखणा नसल्याने नाराज असलेल्या या महिलेने पतीच्या डोक्यात वरवंटा घालून हत्या केली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केलं असून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
"22 वर्षीय या तरुणीचं दोन आठवड्याभरापुर्वीच लग्न झालं होतं. मंगळवारी आपल्या कुड्डालोरमधील घरी त्यांच्यात जोरदार भांडण झालं, ज्यानंतर तिने पतीची हत्या केली", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी पत्नीला तिचे मित्र आणि नातेवाईक यांनी पती दिसायला चांगला नसल्याने चिडवायला सुरुवात केली होती. तुमची जोडी जमत नसल्याचे टोमणे ऐकावे लागत असल्याने महिलेने पतीचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांनी सांगितलं की, "हत्या केल्यानंतर बनाव रचण्याच्या हेतूने महिलेने घराबाहेर धाव घेत पतीची हत्या झाल्याची आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तपास केला असता महिलेनेच हत्या केल्याचं निष्पन्न झालं". मंगळवारी पोलिसांनी महिलेला अटक केली. स्थानिक न्यायालयात हजर केलं असताना महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.