अरे बापरे ! वादानंतर पत्नी, मुलांसह पेटवून दिली कार

By Admin | Updated: August 9, 2016 08:47 IST2016-08-09T08:47:05+5:302016-08-09T08:47:53+5:30

टॅक्सी ड्रायव्हर असणा-या 30 वर्षीय जयपालने घरखर्चासाठी पैसे मिळत नसल्यावरुन आपली पत्नी प्रेमाची जाळून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे

Oh dear! The car was felicitated with wife and children | अरे बापरे ! वादानंतर पत्नी, मुलांसह पेटवून दिली कार

अरे बापरे ! वादानंतर पत्नी, मुलांसह पेटवून दिली कार

>ऑनलाइन लोकमत - 
चेन्नई, दि. 9 - वाद झाल्याने पत्नीला कारमध्येच पेटवून दिल्याची धक्कादायक घडना घडली आहे. टॅक्सी ड्रायव्हर असणा-या 30 वर्षीय जयपालने आपली पत्नी प्रेमाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
 
जयपाल आपली पत्नी प्रेमा आणि दोन मुलांसह कारमधून चालले होते. नंदनम परिसरात पोहोचले असताना जयपाल आणि प्रेमामध्ये घरखर्चासाठी पैसे मिळत नसल्यावरुन वाद झाला. यानंतर चिडलेल्या जयपालने बाटलीमध्ये भरलेलं पेट्रोल प्रेमाच्या अंगावर ओतलं, आणि तिला पेटवून दिलं. 
 
'पत्नीला पेटवून दिल्यानंतर जयपालने स्वत:ला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारली. अशा अवस्थेतही प्रेमाने मुलांचा जीव वाचवत गाडीच्या काचा फोडून त्यांना बाहेर फेकलं. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आपण या प्रकरणात गोवले जाण्याच्या भीतीने जयपालने आत्महत्येचा बनाव रचत रुग्णवाहिका बोलावली, आणि आपल्या पत्नी, मुलांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
प्रेमाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण मृत्यूपुर्वी दिलेल्या जबाबात तिने पतीनेच जाळल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपी पती जयपालला अटक केली आहे. 
 

Web Title: Oh dear! The car was felicitated with wife and children