शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, गोव्याच्या ८ जिल्ह्यांत मोदी पाठवणार अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:33 IST

निवडणुकांच्या आधी योजनांना गती देण्यासाठी तसेच सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) क्लस्टर्सच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातील ८ जिल्ह्यांत अतिरिक्त सचिव व संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी पाठवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : निवडणुकांच्या आधी योजनांना गती देण्यासाठी तसेच सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) क्लस्टर्सच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातील ८ जिल्ह्यांत अतिरिक्त सचिव व संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी पाठवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.हे अधिकारी पुणे, नाशिक, धुळे, सांगली, नागपूर, औरंगाबाद, ठाणे आणि उत्तर गोवा या जिल्ह्यांत जातील. देशात ७५0 केंद्रीय अधिकारी पाठविण्याची मोदींची योजना आहे. ११५ जिल्ह्यांतील ४५ हजार गावांत ७ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर हे अधिकारी देखरेख ठेवतील. एक अधिकारी ७५ गावांवर देखरेख करील. चार ते सात दिवसांत तो किमान तीन गावांना भेट देईल. हे अधिकारी संयुक्त अथवा अतिरिक्त सचिव दर्जाचे असतील. याशिवाय ३२२ संचालक, उपसचिव, ३२२ अवर सचिव दर्जाचे अधिकारी नोडल आॅफिसर म्हणून काम करतील. पहिल्या टप्प्यात ८0 अधिकाऱ्यांची निवड करण्यात येत आहे. ८0 जिल्ह्यांत एमएसएमईसाठी सरकार पॅकेज घोषित करणार आहे. एमएसएमई क्षेत्रात ६ कोटी उद्योग असून १२0 दशलक्ष लोकांना रोजगार दिला जातो. मोदींनी पाठविलेले अधिकारी बँका, ईपीएफओ, ईसीआयएस, एसआयडीबीआय या संस्थांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवा