शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; हत्येची अपील करणाऱ्या काँग्रेस नेत्याविरोधात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:47 IST

पटेरिया यांची अडचण वाढली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने माडण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशातीलकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संविधान, अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासींचे भविष्य वाचवायचे असेल तर पंतप्रधान मोदींची हत्या करण्यासाठी तयार रहा. असे वादग्रस्त विधान पटेरिया यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामुळे पटेरिया यांची अडचण वाढली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने माडण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राजा पटेरिया यांच्या वक्तव्यावर बोलताना, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  सामना करू शकत नाही. यामुळेच, काँग्रेसचे एक नेते हत्येसंदर्भात बोलतात. हे अत्यंत घृनास्पद आहे. काँग्रेसची खरी भावना आता प्रकट होऊ लागली आहे.’

ते ट्विट करत म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेचे ढोंग करणाऱ्यांचे वास्तव आता समोर येत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी जनतेच्या हृदयात आहेत. सम्पूर्ण देशात श्रद्धा आणि आस्थेचे केंद्र आहेत. काँग्रेसचे लोक मैदानात त्यांचा सामना करू शकत नाहीत. यामुळेच त्यांच्या हत्येच्या गोष्टी करतात.’

पटेरिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल -पटेरिया यांच्या वक्तव्यानंतर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, 'ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. ही इटलीची काँग्रेस आहे आणि इटलीची मानसिकता मुसोलिनीची मानसिकता राहिली आहे. ज्या पद्धतीने स्वरा भास्कर, कन्हैया कुमार त्यांच्या यात्रेत चालत आहेत, त्यावरूनही हे स्पष्ट होते. पटेरिया यांनी पीएम मोदींविरोधात केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह विधानासाठी मी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देत आहे. नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनंतर मध्य प्रदेशातील पन्ना येथे पटेरिया यांच्या विरोधात शांतता बिघडवणे आणि असंतोष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हमाले होते राजा पटेरिया -राजा पटेरिया यांचा जो कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ते काही कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. ते सांगतात की, मोदी निवडणुका संपुष्टात  आणतील. मोदी धर्म, जात, भाषा यांच्या आधारावर फूट पाडतील. दलित आणि आदिवासींचं आणि अल्पसंख्याकांचं जीवन संकटात आहे. जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा.  मात्र नंतर त्यांनी या विधानावर सारवासारव केली. तसेच हत्येचा अर्थ पराभव असा सांगितला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश