तोतया सिडको अधिकार्याविरोधात गुन्हा
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:07+5:302015-04-04T01:55:07+5:30
नवी मुंबई : खारघर पोलिसांनी अटक केलेल्या तोतया सिडको अधिकार्याने स्वस्तात घरे देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक केलेली. त्याने फसवणूक केलेल्या इतर तीन घटना समोर आल्या आहेत.

तोतया सिडको अधिकार्याविरोधात गुन्हा
न ी मुंबई : खारघर पोलिसांनी अटक केलेल्या तोतया सिडको अधिकार्याने स्वस्तात घरे देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक केलेली. त्याने फसवणूक केलेल्या इतर तीन घटना समोर आल्या आहेत.धोंडिराम पवार व पंडित पवार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. खारघरमध्ये राहणार्या कमर अकबर यांनी फसवणूक झाल्याची तक्रार केलेली. स्वत:ला सिडकोचा मार्केटिंग ऑफिसर सांगून धोंडिराम पवार याने अनेकांकडून पैसे घेतलेले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली होती. यांच्या चौकशीत इतर तिघांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. सिडकोची घरे स्वस्त किमतीमध्ये मिळवून देतो, असे सांगून पवार याने अनेकांकडून पैसे घेतलेले. त्यानुसार हरपाल सिंग, बलजित कौर, जसपाल कौर यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी पवार याला आठ महिन्यांपूर्वी १० लाख रुपये दिले होते. या प्रकरणात इतरही अनेकजणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)