शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Odisha Train Accident : चमत्कार! वरून पडत होती बोगी अन् आईला सुचला एकमेव मार्ग; अशी वाचवली पोटची 3 मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 17:14 IST

...तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला!

बालासोर - ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात तब्बल 270 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच, एका महिलेने ज्या पद्धतीने आपल्या मुलांना वाचविले, त्याचीही जबरदस्त चर्चा होत आहे. खरे तर ही आई आपल्या सदसद् विवेकबुद्धीने मुलं आणि मृत्यूमध्ये ढालीसारखी उभी राहिली. या अपघातात अनेक बोग्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. दरम्यान एका चक्काचूर झालेल्या बोगीचा काही भाग त्यांच्यावर कोसळणार होता. तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला.

मला वाटले होते आता वाचणार नाही...-जेव्हा ट्रेन एकमेकांवर आदळल्या तेव्हा अक्षरश: बहिरा करणारा आवाज झाला आणि प्रचंड धूर उठला. ही परिस्थिती समजायला 45 वर्षीय सीता दास यांना वेळ लागला नाही. सीता दास यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला खिडकीतून बाहेर फेकले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला शेतं होती. मुलांना वाचवण्यासाठी हीच योग्य जागा आहे असे त्यांना वाटले. सीता सांगतात, 'पहिल्या काही मिनिटांसाठी मला वाटले, मी जगले नाही तर लोक माझ्या मुलांचा जीव वाचवतील. माझे पती जेथे अडकले होते. त्या ठिकाणापासून मी फार दूर नव्हते.

अपघातानंतर संपूर्ण कुटुंब सुरक्षित -सीता आणि त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातातून हे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांचा जीव वाचणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हे कुटुंब चेन्नईला जात होते. तेथे सीता दास यांचे पती नंदू दास प्लंबर म्हणून काम करतात. ओडिशातील बालासोरजवळ कोरोमंडल, शालीमार आणि मालगाडी यांच्यात झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघात