शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

ओडिशा रेल्वे दुर्घटना : ममतांच्या 'त्या' वक्तव्यावर सुवेंदूंचा पलटवार; म्हणाले, अपघाताला TMC च जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 11:08 IST

ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही.

ओडिशा रेल्वेअपघातानंतर, परिस्थिती पुन्हा एकदा पटरीवर आली आहे. मात्र, यासंदर्भात राजकीय पक्षांमध्ये आरोपबॅनर्जीप्रत्यारोप सुरूच आहेत. अपघातानंतर रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांना निशाणा बनवले जात होते. मात्र आता सीबीआय चौकशीचा मुद्दा समोर आल्यानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा विरोधी सूर आळवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय चौकशीसंदर्भात, याने काहीही साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे. पश्चिम बंगालचे विरोध पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या या वक्तव्यावर पलटवार करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मृतांचा आकडा लपवतेय सरकार बॅनर्जी टीएमसी नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचे म्हटले आहे. ममता म्हणाल्या, 'एका बाजूला मृत्यूंचा पूर आहे आणि लोकांप्रती आपल्या मनात कसल्याही प्रकारची सहानुभूती नाही. सरकारचे लोक जनतेसोबत उभे नाहीत. ते कुठल्याही पद्धतीने मृतांच्या आकड्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या स्पर्धेचा भाग नाही. मी नेहमीच लोकांबरोबर उभी आहे.

सीबीआय चौकशीवर खडा केला सवाल - यावेळी ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही. सीबीआय गुन्हे विषयक प्रकरणांचा तपास करते. मात्र ही दुर्घटना आहे. रेल्वे संरक्षण आयोग आहे, सर्वप्रथम तेच चौकशी करतात. लोकांसमोर सत्य यावे एवढीच आमची इच्छा आहे. ही वेळ सत्य दाबण्याची नाही. त्या कुटुंबीयांचा विचार करता ज्यांनी आपले लोक गमावले आहेत.'

भाजपचा पलटवार - ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावरून भाजपने पलटवार केला आहे. पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, या घटनेमागे टीएमसीच आहे. ते दुसऱ्या राज्यातील सीबीआय चौकशीसंदर्भात एवढे चिंतित आणि घबरलेले का? हे कॉल रिकॉर्डिंग जे टीएमसी नेत्यांनी शेअर केले आहे, ज्यात रेल्वेचे दोन अधिकारी बोलत आहेत, त्याची चौकशी व्हायला हवी. आपण बालासोरमध्ये सीबीआयसंदर्भात एवढे चिंतित का?

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेMamata Banerjeeममता बॅनर्जीAccidentअपघात