ओडिशामध्ये शनिवारी दुपारी भुवनेश्वरहून राउरकेला येथे जाणाऱ्या 'इंडिया वन एअर'च्या ९ सीटर विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान राउरकेलाच्या रघुनाथपल्ली परिसरातील जल्दा 'ए' ब्लॉकजवळ कोसळलं.
रिपोर्टनुसार, या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली असून विमानात स्वार असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 'इंडिया वन एअरलाइन्स'च्या विमानाने दुपारी १.३० च्या सुमारास काटीबंधा कंसारा जवळील एका शेतात इमर्जन्सी लँडिंग केली. चार प्रवासी आणि दोन पायलट असलेल्या या सिंगल इंजिन विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या ४-५ किलोमीटरवर त्यात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पायलटला विमानाचं क्रॅश-लँडिंग करावं लागलं.
बचावकार्य आणि मदत
घटनेची माहिती मिळताच राउरकेला आणि पानपोश अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुंदरगड जिल्ह्यातील कंसार येथे विमान कोसळल्यानंतर काही प्रवासी आत अडकले होते, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Summary : A 9-seater 'India One Air' plane crashed during landing near Rourkela, Odisha, injuring six. The plane, en route from Bhubaneswar, experienced a technical fault shortly after takeoff, forcing an emergency landing. Firefighters rescued those trapped inside, and all injured were hospitalized.
Web Summary : ओडिशा के राउरकेला के पास 'इंडिया वन एयर' का 9 सीटर विमान लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें छह लोग घायल हो गए। भुवनेश्वर से आ रहे विमान में उड़ान भरने के तुरंत बाद तकनीकी खराबी आ गई, जिसके कारण आपातकालीन लैंडिंग करनी पड़ी। अग्निशमन कर्मियों ने अंदर फंसे लोगों को बचाया, और सभी घायलों को अस्पताल में भर्ती कराया गया।