अजबच! मंत्र्याने स्वतः डोनरच्या शरीरातून काढलं रक्त; सिंगरवर केला नोटांचा वर्षाव अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 01:12 PM2023-10-19T13:12:37+5:302023-10-19T13:18:47+5:30

ओडिशातील पटनायक सरकारमधील मंत्री शारदा प्रसाद नायक वादात सापडले आहेत. नायक यांचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

odisha minister courts controversy by showering money on singer drawing blood from donor | अजबच! मंत्र्याने स्वतः डोनरच्या शरीरातून काढलं रक्त; सिंगरवर केला नोटांचा वर्षाव अन्...

फोटो - आजतक

ओडिशातील पटनायक सरकारमधील मंत्री शारदा प्रसाद नायक वादात सापडले आहेत. नायक यांचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये ते स्वतः ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये डोनरचं रक्त काढताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते एका सिंगरवर पैशांचा वर्षाव करताना दिसत आहे. याबाबत ओडिशात प्रचंड गदारोळ सुरू आहे.

कामगार आणि ईएसआय मंत्री शारदा प्रसाद नायक 16 ऑक्टोबर रोजी राउरकेला सरकारी रुग्णालयात आयोजित ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये पोहोचले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक नर्स डोनरजवळ उभी असल्याचं दिसून येते. असं असतानाही मंत्री स्वतः सुईने डोनरचं रक्त काढू लागले. त्यानंतर कोणताही अनुभव नसताना मंत्री अशा पद्धतीने रक्त कसे काढू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्याचवेळी शारदा प्रसाद यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते एका कव्वालीच्या कार्यक्रमात पोहोचले होते. जिथे ते एका सिंगरवर पैसे खर्च करताना दिसतात. मात्र, वाद वाढत गेल्याने मंत्री शारदा प्रसाद यांनीही स्वतःचा बचाव केला. ते म्हणाले, डोनरने मला रक्त काढण्याची विनंती केली. म्हणून मी नर्सच्या मदतीने डोनरच्या इच्छेचा आदर केला. इतकेच नाही तर शारदा प्रसाद यांनी दावा केला की, कोरोनाच्या काळात जेव्हा लोक घराबाहेर पडत नव्हते, तेव्हा त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत 24 तास काम केलं होतं.

सिंगरवर पैसे उधळण्याच्या प्रश्नावर नायक म्हणाले, "प्रसिद्ध कव्वाली सिंगर देशाचा गौरव करणारे गाणे गात होते आणि प्रेक्षकांना त्यांचा सन्मान करायचा होता." लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांनी मला सिंगरचा सन्मान करण्याचं आवाहन केलं. म्हणून मी कमावलेल्या पैशातून काही रोख देऊ केली. मात्र या प्रकरणाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे, हे दुर्दैव आहे. शारदा प्रसादही स्टेजवर डान्स करताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: odisha minister courts controversy by showering money on singer drawing blood from donor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Odishaओदिशा