शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

Odisha Lok Sabha Election 2019 Result: ओडिशात पुन्हा 'बीजेडी' की इतिहास घडवणार मोदी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 10:17 IST

'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं कट्टर तयारी केली होती. मोदींसाठी तर ही लढाई प्रतिष्ठेची आहे.

ठळक मुद्दे2014 मध्ये देशात भले मोदी लाट उसळली होती, परंतु ओडिशातील 21 पैकी 20 जागांवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलानं आपला झेंडा फडकवला होता. 'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं कट्टर तयारी केली होती. मोदींसाठी तर ही लढाई प्रतिष्ठेची आहे.ओडिशाची जनता बीजू जनता दलालाच साथ देते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 

भुवनेश्वर - 2014 मध्ये देशात भले मोदी लाट उसळली होती, परंतु ओडिशातील 21 पैकी 20 जागांवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलानं आपला झेंडा फडकवला होता. त्यांची ही ताकद लक्षात घेऊन, यावेळी त्यांना 'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं कट्टर तयारी केली होती. मोदींसाठी तर ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यात त्यांना यश येतं, की यावेळीही ओडिशाची जनता बीजू जनता दलालाच साथ देते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांच्या तुलनेत ओडिशातून कमी खासदार लोकसभेत जात असले, तरी यावेळी तेच निर्णायक ठरू शकतात, असं जाणकारांनी सूचित केलंय. बीजू जनता दलाने गेल्या निवडणुकीप्रमाणेच मुसंडी मारली आणि इकडे त्रिशंकू निकाल लागला, तर देशाचा नायक ठरवण्यात नवीन पटनायक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अर्थात, आपण कुणासोबत आहोत किंवा कुणासोबत जाऊ, हे त्यांनी अजूनही गुलदस्त्यातच ठेवलं आहे.

'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालOdisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपा