ओडिशा विधानसभेत हिंदी बोलण्यास मनाई

By Admin | Updated: June 18, 2014 15:07 IST2014-06-18T15:07:43+5:302014-06-18T15:07:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिंदी भाषा बोलण्यास प्राधान्य देण्‍यात येत असतानाच ओडिशा विधानसभेत मात्र हिंदी भाषा बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.

In Odisha assembly, there was no ban on Hindi | ओडिशा विधानसभेत हिंदी बोलण्यास मनाई

ओडिशा विधानसभेत हिंदी बोलण्यास मनाई

>ऑनलाइन टीम 
भुवनेश्चर , दि. १८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिंदी भाषा बोलण्यास प्राधान्य देण्‍यात येत असतानाच ओडिशा विधानसभेत मात्र हिंदी भाषा बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.
 सोमवारी ओडिशा विधानसभेत विधानसभाध्यक्षाने एका आमदाराला हिंदीत बोलण्यास मनाई केली. हिंदीत मनाई केल्याने त्या आमदाराने उडिया आणि इंग्रजी भाषाचा सहारा घेत आपला प्रश्न विधानसभेत मांडला. पारलाखेमुंडी विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले सूर्या राव गजपती या आमदाराने आपला प्रश्न हिंदीत बोलत असतानाच विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना हिंदीत बोलण्यास मनाई केली. आमदाराच्या विधानसभा क्षेत्रात वादळाने झालेल्या शेतक-यांच्या नुकसानामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आमदाराने विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला परंतू विधानसभा अध्यक्षाने त्यांना हिंदीत बोलण्यास मनाई केली. 

Web Title: In Odisha assembly, there was no ban on Hindi