आणखी एका बँकेत महाघोटाळा, हिरे व्यापाऱ्यानं केला 390 कोटींचा गोलमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 13:45 IST2018-02-24T08:57:27+5:302018-02-24T13:45:40+5:30
नीरव मोदीने 11 हजार कोटी तर कोठारी पिता-पुत्रांनी 3695 कोटींचा या बँकेला चुना लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आणखी एका बँकेत महाघोटाळा, हिरे व्यापाऱ्यानं केला 390 कोटींचा गोलमाल
नवी दिल्ली - आपल्या देशात सध्या पीएनबी बँकेचा घोटाळा चांगलाच गाजतो आहे. नीरव मोदीने 11 हजार कोटी तर कोठारी पिता-पुत्रांनी 3695 कोटींचा या बँकेला चुना लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत सीबीआयनं एका हिरे व्यापऱ्याविरोधात फसवणूकीची केस दाखल केली आहे. या हिरे व्यापऱ्यानं बँकेत 390 कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याचे समोर आलं आहे.
आणखी एक बँक घोटाळा उघड, हिरे व्यपाऱ्यानं केला 390 कोटींचा महाघोटाळा390 कोटी रुपयांचा हा महाघोटाळा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत झाला आहे. सीबीआयनं कथित महाघोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने सीबीआयकडे सहा महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीचे संचालक सभ्य सेठ, रीता सेठ, कृष्ण कुमार सिंह, रवी सिंह आणि कंपनी द्वारका दास सेठ एसआयजेड इनकॉर्पोरेशन यांची नावे आहेत. द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेडने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेतून 2007 ते 2012 दरम्यान 390 कोटींचं कर्ज घेतले होते.
बँकेकडून तपासणी केली असता यामध्ये असे समोर आलं की, कर्ज घेतना लेटर ऑफ क्रेडिटचा वापर कऱण्यात आला आहे. मौल्यवाल वस्तू आणि सोन्याच्या खरेदीसाठी याचा वापर कऱण्यात आला आहे. द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड या कंपनीनं बोगस कागदपत्राद्वारे घेवाणदेवाण करत पैसा विदेश पोहचवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.