वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी घेणार ओबामांची भेट
By Admin | Updated: June 5, 2014 10:02 IST2014-06-05T10:00:39+5:302014-06-05T10:02:18+5:30
पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर नरेंद्र मोदींनी परदेश धोरणासंदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.

वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी घेणार ओबामांची भेट
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर नरेंद्र मोदींनी परदेश धोरणासंदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी ही भेट होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. गुजरात दंगलीतील नरसंहाराच्या कारणावरुन अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता. मात्र आता मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होताच अमेरिकेची मोदींविषयीच्या भूमिका बदलली आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दुरध्वनीद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. या संभाषणादरम्यान त्यांनी मोदींना अमेरिकेत येण्याचे निमंत्रणही दिले होते. मोदींनी हे निमंत्रण स्वीकारले असून सप्टेंबरमध्ये मोदी अमेरिकेला जाणार आहेत. वॉशिंग्टन येथे मोदी व बराक ओबामा यांची भेट होणार असून या भेटीत दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यावर भर देण्यात येईल.