ओबामांची भारतभेट ठरू शकते लष्करचे ‘टार्गेट’
By Admin | Updated: December 18, 2014 05:27 IST2014-12-18T05:27:40+5:302014-12-18T05:27:40+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताकदिनी खास पाहुणे राहणार असून त्यांच्या भेटीला लक्ष्य ठरवून लष्कर-ए-तोयबाकडून हल्ला केला जाऊ शकतो

ओबामांची भारतभेट ठरू शकते लष्करचे ‘टार्गेट’
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताकदिनी खास पाहुणे राहणार असून त्यांच्या भेटीला लक्ष्य ठरवून लष्कर-ए-तोयबाकडून हल्ला केला जाऊ शकतो, या गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक स्थळे, शाळा आणि मॉलसारख्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
पेशावर येथील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले.
ओबामा हे २६ जानेवारी रोजी भारतभेटीवर येत असून पळून गेलेल्या या अतिरेक्यांपैकी एक किंवा दोन जणांकडून त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता पाहता गृहमंत्रालयाने सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे.
शाळांची सुरक्षा
मजबूत करा- केंद्राचे निर्देश
देशभरातील शाळांमध्ये संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश केंद्राने तातडीने राज्यांना दिले आहेत. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना, राज्य सरकारांना राज्यातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविणे व अधिक भक्कम करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.