नन बलात्कारप्रकरणी सुनावणीस तयार- सुप्रीम कोर्ट
By Admin | Updated: March 20, 2015 23:54 IST2015-03-20T23:54:52+5:302015-03-20T23:54:52+5:30
प. बंगालमधील ७१ वर्षीय ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी याचिका दाखल केली जात असल्यास सुनावणी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दर्शविली.

नन बलात्कारप्रकरणी सुनावणीस तयार- सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : प. बंगालमधील ७१ वर्षीय ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी याचिका दाखल केली जात असल्यास सुनावणी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दर्शविली. स्वत:हून दखल घेण्याचे टाळत एका महिला वकिलाला याचिका दाखल करण्याची परवानगीही सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने दिली. दरम्यान, या प्रकरणी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आले आहे. वकील लिली थॉमस यांनी मौखिक विनंती करताना न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घ्यावी, असे सुचविले होते. दरम्यान, थॉमस यांनी याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.
अज्ञात ठिकाणी रवाना
रानाघाट येथील पीडित ननला शुक्रवारी पहाटे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यानंतर पीडितेस अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे. पीडित ननला येथून ६४ कि. मी. अंतरावरील कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)