शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्यांची संख्या घटली

By admin | Updated: March 5, 2015 22:57 IST

अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

सुरक्षेची चिंता : असोचेमचे सर्वेक्षणनवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून असोचेमने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार रात्रपाळी, उशिरापर्यंत थांबावे लागणे किंवा कार्यालय वा कामाचे ठिकाण शहराबाहेर असणे, अशा कारणांमुळे महिला कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षात २६.५ टक्क्यांनी घटली आहे.मागची दोन वर्षे अर्थव्यवस्थेत मंदी होती. त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या दृष्टीने संधीही कमी झाल्या. ही स्थिती बदलण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने सक्रिय भूमिका घेणे जरूरी आहे. २० ते ५० वर्षे वयोगटातील जवळपास १,६०० महिलांशी केलेल्या चर्चेच्या आधारे तयार करण्यात आलेला हा सर्वेक्षणात्मक अहवाल येथे एका कार्यक्रमात जारी करण्यात आला. यावेळी अलका लांबा, स्पाईस ग्रुपच्या कार्पोरेट समूह अध्यक्ष प्रीती मल्होत्रा आदींची उपस्थिती होती. दिल्लीला महिलांसाठी अनुकूल राजधानी करण्याची गरज आहे. तसेच महिलांमधील असुरक्षिततेची भावनाही दूर करणे जरूरी आहे, असे मत आम आदमी पार्टीच्या अलका लांबा यांनी व्यक्त केले.कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रीती मल्होत्रा यांनी सांगितले.घर सांभाळून महिला नोकरीही करतात. आरामदायी कल्याणासोबत त्यांना सुरक्षा दिल्याशिवाय त्यांच्या लोकसंख्येचा फायदा घेता येणार नाही, असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यावेळी सांगितले.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४८ टक्के महिलांचे म्हणणे आहे की, निर्भया प्रकरणानंतरच्या दोन वर्षादरम्यान सुरक्षेची चिंता कमी होण्याऐवजी वाढली आहे. दिल्लीनंतर बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, लखनौतील स्थिती महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नाही.राष्ट्रीय गुन्हा नोंदणी केंद्राच्या २०१२ च्या आकडेवारीनुसार महिलांविरोधी गुन्ह्यांत १४.२ टक्क्यांनी दिल्लीचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बंगळुरु (६.२ टक्के), कोलकात्याचा (५.७ टक्के ) क्रमांक लागतो.