स्वाईन फ्लू बळींची संख्या ६६३ वर १० हजारांवर लोकांना संसर्ग
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:52+5:302015-02-18T23:53:52+5:30
नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्यांची संख्या बुधवारी वाढून ६६३ वर पोहोचली़ स्वाईन फ्लू बाधितांचा आकडाही १० हजारांवर गेला़ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांसह नागालँडमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़

स्वाईन फ्लू बळींची संख्या ६६३ वर १० हजारांवर लोकांना संसर्ग
न ी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्यांची संख्या बुधवारी वाढून ६६३ वर पोहोचली़ स्वाईन फ्लू बाधितांचा आकडाही १० हजारांवर गेला़ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांसह नागालँडमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़औषधांचा कुठलाही तुटवडा नसल्याचे आणि रुग्णालयांतील स्वाईन फ्लूशी निपटणारी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री जे़पी़ नड्डा यांनी केला असतानाच, स्वाईन फ्लूवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही़ १६ ते १७ फेबु्रवारीदरम्यान या आजाराने आणखी ३९ बळी घेतले आहेत़ यातच केंद्र आणि राज्यातील आकडेवारीही विसंगत असल्याचे समोर आले आहे़ जम्मू काश्मिरात स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्यांची संख्या तीन असल्याचे केंद्र सांगत आहे़ याउलट राज्याच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने ही संख्या ७० च्या घरात असल्याचे म्हटले आहे़ नागालँडमध्ये स्वाईन फ्लूचे पहिले प्रकरण समोर आले आहे़ येथील एका महिलेला या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे़