शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या घटनांमध्ये नंबर वन, कारण राजस्थान हे मर्दांचं राज्य.; मंत्री शांती धारिवाल यांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:22 IST

Controversial statement of Minister Shanti Dhariwal : यूट्यूब  चॅनेल आणि विधानसभेच्या रेकॉर्डमधून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला. धारिवाल बोलत असताना सभागृहात भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता.

राजस्थान विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी अधिवेशनात चर्चेदरम्यान अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील एका मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. मंत्री शांती धारिवाल यांनी विधानसभेत बोलताना राजस्थान राज्य बलात्काराच्या बाबतील देशात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगितले. याचे कारण म्हणजे राजस्थान हा मर्दांचे राज्य असल्याने इथे जास्त बलात्कार होत असल्याचे धक्कादायक आणि लाजिरवाणं वक्तव्य त्यांनी केले आणि असे वक्तव्य करताना धारीवाल चक्क हसत होते. तसेच त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि काँग्रेसचे नेतेही हसू लागले.

या सर्व प्रकरणाने राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगले तापले. या प्रकरणावर आता मंत्री शांती धारिवाल यांनी प्रतिक्रिया दिली. या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी यावर माफी मागत स्पष्टीकरण दिले. शांती धारिवाल याबाबत बोलताना म्हणाले की, मी नेहमीच महिलांचा आदर करतो आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. विधानसभेमध्ये बोलताना माझी जीभ घसरली. मला, ‘इस प्रदेश में ये मरज़ कहां से आ गया’ असे म्हणायचे होते, परंतु चुकून ‘ये मर्दों का प्रदेश है’, असे उद्गार तोंडातून बाहेर पडले. मी सभागृहाची माफी मागतो. धारीवाल यांनी जेव्हा विधानसभेत बोलत होते. तेव्हा विधानसभेचे थेट प्रक्षेपण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून केले जात होते. नंतर  यूट्यूब  चॅनेल आणि विधानसभेच्या रेकॉर्डमधून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला. धारिवाल बोलत असताना सभागृहात भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसministerमंत्री