चीनमधील भूकंप बळींची संख्या 400 वर
By Admin | Updated: August 5, 2014 02:42 IST2014-08-05T02:42:54+5:302014-08-05T02:42:54+5:30
चीनने भूकंपग्रस्त युन्नान प्रांताकडे सोमवारी हजारो सैनिक, पोलीस आणि अग्निशमन कर्मचा:यांसह आठ विमाने रवाना केली.

चीनमधील भूकंप बळींची संख्या 400 वर
रायपूर : महिलांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणा:या दोन योजनांमध्ये गेल्या काही वर्षात एकटय़ा रायपूर जिल्ह्यात वयाची शंभरी ओलांडलेल्या सुमारे 7,6क्क् महिलांना सायकली आणि शिवणयंत्रंचे वाटप करून भाजपाशासित छत्तीसगढ सरकारच्या कामगार खात्याने एक वेगळाच जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे!
ज्ञात मानवी इतिहासात सर्वाधिक जगलेली महिला होण्याचा मान फ्रान्सच्या जेन कालमेंट यांच्या नावे नोंदविलेला आहे. जेनचे 1997 मध्ये वयाच्या 122 व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर आता 116 वर्षाची जपानची मिसाओ ओकावा ही सध्या हयात असलेली सर्वात वयोवृद्ध महिला असल्याचा विक्रम नोंदविला गेला आहे. पण छत्तीसगढ सरकारला बहुधा हे विक्रम मान्य नाहीत. कारण त्यांनी पुष्पा साहु आणि उषा जामगडे या अनुक्रमे 732 व 532 वर्षे वयाच्या महिलांनाही सायकलींचे वाटप केले आहे!
ही धक्कादायक माहिती ऐकीव नसून छत्तीसगढ सरकारच्या कामगार खात्याने माहिती अधिकाराखाली ही माहिती अधिकृतपणो दिलेली आहे. असंघटित क्षेत्रतील महिला कामगारांसाठी राज्य सरकारकडून 2क्क्8 पासून ‘मुख्यमंत्री सिलाई मशिन योजना’ व ‘मुख्यमंत्री सायकल सहायता योजना’ या दोन योजना राबविल्या जातात. संजीव अग्रवाल व राजीव ब्रिगेडच्या कार्यकत्र्यानी या जवळजवळ अमरत्व लाभलेल्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण एक तर कोणाही मानव एवढा जगणो शक्य नसल्याने व उपलब्ध असलेला पत्ता अत्यंत त्रोटक असल्याने यापैकी शंभरी ओलांडलेली एकही लाभार्थी महिला त्यांना प्रत्यक्षात आढळली नाही. ही आकडेवारी फक्त रायपूर जिल्ह्यापुरती असल्याने इतर जिल्ह्यांमधून अशीच माहिती घेण्याच्या हालचाली काँग्रेस कार्यकत्र्यानी सुरु केल्या आहेत.या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीत मोठा घोळ असल्याचा संशय काँग्रसने व्यक्त केला असून याची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते शैलेश नितीन त्रिवेदी यांनी केली. (वृत्तसंस्था)
4 राजीव ब्रिगेडचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांनी या दोन्ही योजनांच्या लाभार्थीची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती. त्याच्या उत्तरात सरकारच्या कामगार खात्याने ही धक्कादायक आकडेवारी दिली आहे.
4 त्यानुसार एकटय़ा रायपूर जिल्ह्यात आतार्पयत सुमारे 19,398 महिलांना शिवणयंत्रंचे व 4,936 महिलांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर शिवणयंत्रे दिलेल्या 6,231 तर सायकली दिलेल्या 1,368 महिला 1क्क् ते 732 या वयोगटातील आहेत.
‘कोणताही घोटाळा नाही‘
4 योजनांमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. आम्ही ‘डेटा एन्ट्री’चे काम बाहेरच्या खासगी संस्थेस दिले होते. त्यांच्याकडून सॉफ्टवेअरमध्ये काही तरी गडबड झाल्याने ‘आरटीआय’ खाली दिल्या गेलेल्या उत्तरांमध्ये लाभार्थीच्या वयाचे अविश्वसनीय असे आकडे नोंदले गेले आहेत, असे छत्तीसगढचे कामगार आयुक्त, जितेन कुमार यांनी सांगितले.