सलग पाचव्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 03:14 AM2020-09-24T03:14:19+5:302020-09-24T03:15:10+5:30

देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६,४६०११ असून, बरे झालेल्यांचा आकडा ४५,८७,६१४ आहे. ९,६८,३७७ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

The number of cures for the fifth day as the number of new corona patients | सलग पाचव्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक

सलग पाचव्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सलग पाचव्या दिवशी रविवारी देशात कोरोना आजारातून बरे झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक झाली आहे. देशभरात रविवारी कोरोनाचे ८३,३४७ नवे रुग्ण आढळून आले, तर ८९,७४६ जण या आजारातून बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ४५ लाख ८७ हजारांवर, तर कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५६ लाखांवर पोहोचली आहे. या आजारामुळे आणखी १०८५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बळींची एकूण संख्या ९०,०२० झाली आहे.


केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६,४६०११ असून, बरे झालेल्यांचा आकडा ४५,८७,६१४ आहे. ९,६८,३७७ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जगामध्ये दररोज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भारतात सापडत आहेत. मात्र, सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत दुसºया क्रमांकावर आहे.


कोरोना चाचण्यांची संख्या ६.६२ कोटींवर
देशाने दररोज १२ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्याची क्षमता गाठली आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी
9,53,683
कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आता चाचण्यांची एकूण संख्या
6,62,79,462
इतकी झाली आहे.


अस्ट्राझेनेकाच्या लसीची अमेरिकेत चाचणी थांबलेलीच
न्यूयॉर्क : अस्ट्राझेनेका पीएलसीच्या कोरोनावरील लसीची चाचणी अमेरिकेत थांबलेलीच आहे, असे आरोग्य व मानवीसेवा मंत्री अलेक्स अझर यांनी सांगितले. तर अमेरिकेचा एफडीए जागतिक चाचणीवेळी रुग्णाला कोणता आजार झाला, या आजाराची चौकशी करीत आहे. अझर यांनी सांगितले की, अमेरिकेत एफडीएकडून चौकशी सुरू असली तरी अमेरिकेच्या बाहेर मात्र याच्या चाचण्या सुरू आहेत. याचा अर्थ लस सुरक्षित असावी, यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत.

Web Title: The number of cures for the fifth day as the number of new corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.