शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अस्थानांविरुद्धच्या तपासात दोवाल यांचा हस्तक्षेप; सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:43 IST

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या दोन कोटी रुपयांच्या लाच घेतल्याच्या आरोपाच्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी हस्तक्षेप केला.

नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या दोन कोटी रुपयांच्या लाच घेतल्याच्या आरोपाच्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी हस्तक्षेप केला व अस्थानांच्या घराची झडती घेण्यातही त्यांनी खोडा घातला, असा आरोप सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.आलोक वर्मा यांनी त्या कारवाईविरुद्ध केलेली याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच याचिकेत सहभागी होण्यासाठी केलेल्या अर्जात मनीष कुमार सिन्हा यांनी हा आरोप केला. सिन्हा उपमहानिरीक्षक असून, अस्थाना यांच्याविरुद्धच्या तपासात ते पर्यवेक्षक अधिकारी होते. वर्मा व अस्थाना यांना रजेवर पाठविल्यानंतर नेमलेले हंगामी संचालक नागेश्वर राव यांनी सिन्हा यांची बदली नागपूरला केली. अस्थाना यांना वाचविण्यासाठी सरकारमधील उच्चपदस्थांच्या इशाºयावरून केलेली ही अन्याय्य बदली रद्द करावी, अशी त्यांची विनंती आहे. सिन्हांचे अ‍ॅड. सुनील फर्नांडिस यांनी अर्जात धक्कादायक माहिती असल्याचे सांगून लगेच सुनावणीची विनंती केली; सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ती अमान्य केली. सतीश बाबू सानाच्या तक्रारीवरून अस्थाना यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला गेला. सीबीआयतील प्रकरणे मिटविण्यासाठी केंद्रीय कोळसा व खाण राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनाही आपण कित्येक कोटींची लाच दिल्याचे साना यांनी सांगितल्याचाही आरोप सिन्हांच्या अर्जात आहे. राज्यमंत्री चौधरी गुजरातचे असून, ते मोदींच्या जवळचे मानले जातात. सिन्हा यांनी अर्जात दावा केला की, फोन संभाषणांवर नजर ठेवली असता ‘पीएमओ’ने सीबीआयचा विषय मॅनेज केला आहे’, असे ‘रॉ’मधील अधिकारी सामंतकुमार गोयल सांगत असल्याचे ऐकू येते. ज्या दिवशी हे संभाषण झाले त्याच रात्री अस्थाना यांचा तपास करणारे तपास पथक बदलण्यात आले.वर्मा यांचे उत्तर दाखलवर्मा यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होईल. आपल्याविरुद्धच्या सीव्हीसी अहवालावरील आपले म्हणणे वर्मा यांनी आज सादर केले. त्याआधी त्यांनी उत्तरास आणखी वेळ द्यावा, अशी विनंती केली; परंतु ती अमान्य करताना न्या. गोगोई म्हणाले की, उद्याची सुनावणी पुढे ढकलणार नाही. त्याआधी तुमचे उत्तर वाचायचे असल्याने ते दिवसभरात सादर करा.

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालCBIगुन्हा अन्वेषण विभाग