शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही; भाजपाला मित्रपक्षाकडून धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:30 IST

एनआरसीची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बिहार विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणण्यास जनता दल (यू)-भाजपचे आघाडी सरकार तयार आहे.

पाटणा : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) ची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही तो लागू करण्याची आवश्यकता नाही आणि तशी कृती करण्याचे औचित्यही दिसत नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. मित्रपक्ष असलेल्या जनता दल (संयुक्त)च्या अध्यक्षांनीच ही भूमिका घेतल्याने भाजप नेते अस्वस्थझाले आहेत.

याआधी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या अकाली दल व आसाम गण परिषदेनेही हीच भूमिका घेतली. भाजपचे समर्थन करणाऱ्या बिजू जनता दलानेही आता त्याला विरोध केला आहे आणि आता नितीश कुमार यांच्या पक्षानेही विरोध केला आहे. त्यांच्या आधी त्या पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनीही एनआरसी व सीएएला विरोध दर्शवला होता.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, एनपीआर या तीन विषयांवर भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू)चे प्रमुख व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केली होती. त्यानंतर नितीशकुमार यांनी एनआरसी देशात राबवावी, असा आग्रह धरला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात जागोजागी निदर्शने होत आहेत.

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न सोडविण्यासाठी एनआरसी तयार करण्यात आली. आसाममधील संघटनांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर केलेल्या करारामध्ये या योजनेची तरतूद होती. एनआरसी देशभरात राबविण्याची गरज नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे असे नितीशकुमार म्हणाले.भूमिका बदलणार?नितीशकुमार म्हणाले की, एनआरसीची बिहारमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बिहार विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणण्यास जनता दल (यू)-भाजपचे आघाडी सरकार तयार आहे. या विधेयकाला संसदेत जनता दल (यू)ने पाठिंबा दिला होता. कायद्याविरोधात देशभर सुरू असलेली निदर्शनांमुळे नितीशकुमार भूमिका बदलण्याचा विचार करीत आहेत की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा