"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:19 IST2025-09-12T18:18:21+5:302025-09-12T18:19:18+5:30

एक देश म्हणून आपल्याला जगायचे आहे आणि मोठे व्हायचे आहे. जगाचा स्वभावच आहे, जे बनले आहेत, त्याचेच ऐकले जाते.

Nowadays even friends have become like snakes rss chief Mohan Bhagwat's big statement Spoken clearly | "आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे. आजकाल मित्र सापासारखे झाले आहेत, असे म्हणत त्यांनी सापाची एक कहाणी सांगत अमेरिकेवर निशाणा साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भात बोलताना भागवत म्हणाले, "अमेरिका भारताच्या प्रगतीला घाबरते, म्हणूच त्यांनी अशा देशाना जवळ करायला सुरुवात केली आहे, जे प्रत्यक्षात धोकादायक आहेत. भारतावर दबाव आणण्याच्या हेतूने त्या देशाला अमेरिका यासाठी पुचकारत आहे." ते एका कार्यक्रमात बोलत होते. 

कोणत्याही देशाचे नाव न घेता मोहन भागवत म्हणाले, "आज अनेक लोकांना वाटते की, हा मोठा झाला तर काय होईल? जर भारत मोठा झाला तर काय होईल? म्हणून त्यावर टॅरिफ लावा. पण खरो खरच ज्यापासून धोका आहे त्याला पुचकारत आहे. भारतावर दबाव  निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. पण आपण तर सातासमुद्रापार आहात. आपल्याला भारतापासून कसले भय आहे?

मोहन भागवतांनी सांगितल सापाची कहाणी -
भागवत म्हणाले, 'मला हे हवे... खरे तर हेच सातत्याने व्यक्ती आणि राष्ट्रांमधील भांडणांचे मुख्य कारण राहिले आहे.' ते पुढे म्हणाले, "एक कथा आहे, एका रस्त्यावर एक विषारी साप राहत होता. लोक तेथे जायला घाबरत होते. एकदा तथागत त्या रस्त्याने जात असताना काही लोकांनी त्यांना थांबवले. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिच्या आंतरिक व्यक्तिमत्वाचा बोध होतो, तेव्हा कुठलीही परिस्थिती येओ, ती बदलते. तर जेव्हा तथागत त्या रस्त्यावरून गेले, तेव्हा सापाने आपला फणा मिटवून त्यांना जाऊ दिले. आज के तथाकथित बुद्धिजीवी याचा पुरावा मागतील, पण तुम्ही तथागतांसारखी तपश्चर्या केली, तर तुम्हीही त्याच्यासारखेच व्हाल.' ते म्हणाले, सर्व साप चावत नाहीत, विषारी सापही असेच चावत नाहीत आणि ते आले, तरी आपण त्यांना जंगलाता सोडून येतो.

मोहन भागवत म्हणाले, आज लोकांचे ज्ञान वाढले आहे. सापही निसर्गाचे मित्र बनले आहेत. जर आपल्यात ही भावना असेल, तर आपल्याला असुरक्षित वाटणार नाही. ती भावना येणार नाही. ते पुढे म्हणाले, संघाचे नसलेले लोकही विचार करतात की, मी खरोखर काय आहे...? शरीरानंतर काय होणार...? एक देश म्हणून आपल्याला जगायचे आहे आणि मोठे व्हायचे आहे. जगाचा स्वभावच आहे, जे बनले आहेत, त्याचेच ऐकले जाते.

Web Title: Nowadays even friends have become like snakes rss chief Mohan Bhagwat's big statement Spoken clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.