शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'पप्पू' ऐवजी आता 'युवराज', भाजपाचा नवा व्हिडिओ रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 15:01 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये पप्पू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपाने पप्पू शब्द वगळून त्याऐवजी युवराज शब्द वापरला आहे. 

ठळक मुद्दे'पप्पू' ऐवजी आता 'युवराज'अभिनेते परेश रावल यांनी केले अनोखे ट्विट यशवंत सिन्हांनी मोदींची तुलना केली तुघलकाशी

अहमदाबाद : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये पप्पू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपाने पप्पू शब्द वगळून त्याऐवजी युवराज शब्द वापरला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून निवडणूक प्रचारासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला  होता. यामध्ये अभिनेते मनोज जोशी एका पुस्तक स्टॉलचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या व्हिडिओमधून पप्पू शब्दाचा वापर करुन राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाने पप्पू शब्दावर आक्षेप घेतल्यावर आता त्याजागी युवराज हा शब्द वापरण्यात आला आहे. दुसरीकडे, पप्पू शब्द बदलण्यात आल्यानंतर भाजपाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी अनोखे ट्विट करत राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. त्यांनी प.पु.राहुल भाई असे ट्विट केले आहे. 

दरम्यान, आयोगाकडून पप्पू शब्द वापरायला मनाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की जाहिरातींचे लेखन हे कोणत्याही व्यक्तिशी संबंधित नव्हते. गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेखालील प्रसारमाध्यम समितीने तिच्याकडे गेल्या महिन्यात मंजुरीसाठी सादर केलेल्या जाहिरातीतील शब्दाला आक्षेप घेतला होता, असे भाजपाने म्हटले. निवडणुकीशी संबंधित कोणतीही जाहिरात करायच्या आधी आम्हाला समितीकडे प्रमाणपत्रासाठी तिचे लेखन सादर करावे लागते. तथापि, समितीने पप्पू या शब्दाला तो मानहानिकारक असल्याचे सांगून आक्षेप घेतला. तो शब्द काढून टाकून त्याऐवजी दुसरा शब्द वापरण्यास त्यांनी आम्हाला सांगितल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

यशवंत सिन्हांनी मोदींची तुलना केली तुघलकाशीभाजपाचे नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोटांबदीच्या निर्णयासाठी महंमद बिन तुघलकाशी तुलना केली. सिन्हा म्हणाले की, 14 व्या शतकातील दिल्लीचा राजा तुघलकानेही 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. येथे कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी मोदी यांच्या वादग्रस्त ठरलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 3.75 लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा केला. अनेक राजे पूर्वी होऊन गेले की ज्यांनी आपले स्वत:चे चलन आणले. काही जणांनी नवे चलन आणल्यानंतरही जुनेही कायम ठेवले. परंतु 700 वर्षांपूर्वीच्या शहेनशाहने (तुघलक) स्वत:चे चलन आणल्यानंतर जुने चलन रद्द केले होते. तुघलकाची दिल्लीतील राजवट फारच थोडा काळ होती तरी त्याने राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा