शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता आम्ही निर्णय घेण्यास मोकळे! अपना दल भाजपाची साथ सोडणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 08:22 IST

एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी  भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देएनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी दिला एनडीए सोडण्याचा इशारा केंद्रामध्ये अपना दलच्या कोट्यातून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्येही अपना दलचा एक मंत्री आहे

लखनौ - एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी  भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे. अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, ''भाजपाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही. अपना दलने  भाजपाला 20 फेब्रुवारीपर्यंत आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यास सांगितले होते.  मात्र भाजपाने आमच्या तक्रारींचे निवारण केलेले नाही. त्यामुळे आता अपना दल आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. आता 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आम्ही पुढील निर्णय घेऊ.'' 

   मात्र अनुप्रिया पटेल यांनी भाजपाने दिलेली आश्वासने आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा मुद्दा बनेल का असे विचारले असता अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, मला वाटत नाही की राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनेल. तसेच आगामी निवडणुकीत कुणाचे तिकीट कापायचे आणि कुणाला उमेदवारी द्यायची हा पूर्णपणे भाजपाचा अंतर्गत निर्णय असेल.'' 

उत्तर प्रदेशमध्ये अपना दल हा भाजपाचा सहकारी पक्ष आहे.  केंद्रामध्ये अपना दलच्या कोट्यातून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्येही अपना दलचा एक मंत्री आहे. गेल्या काही काळापासून अपना दल भाजपावर नाराज आहे. यावेळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. 2014 मध्ये अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. तसेच दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला होता.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण