आता आली 'स्मार्ट बस'... बॅटरी फुल चार्ज करा, 70 किमी बिनधास्त फिरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 13:14 IST2019-01-05T12:49:59+5:302019-01-05T13:14:37+5:30

पंजाबच्या लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या (LPU) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्ट बस तयार केली आहे. सौर ऊर्जेवर चालणारी ही बस डायव्हरलेस असणार आहे. 

Now there's a 'smart bus' ... charge the battery full, 70 km fir! | आता आली 'स्मार्ट बस'... बॅटरी फुल चार्ज करा, 70 किमी बिनधास्त फिरा!

आता आली 'स्मार्ट बस'... बॅटरी फुल चार्ज करा, 70 किमी बिनधास्त फिरा!

ठळक मुद्देपंजाबच्या लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या (LPU) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्ट बस तयार केली आहे.सौर ऊर्जेवर चालणारी ही बस डायव्हरलेस असणार आहे. स्मार्ट बस ही पूर्णत: प्रदूषण फ्री असणार असून त्याची किंमत जवळपास सहा लाख असणार आहे. 

नवी दिल्ली - आथर एनर्जी या कंपनीने देशातील पहिली स्वदेशी अॅन्ड्रॉइड इलेक्ट्रिक स्कूटर काही दिवसांपूर्वीच लाँच केली आहे. या स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (LPU) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्ट बस तयार केली आहे. सौर ऊर्जेवर चालणारी ही बस डायव्हरलेस असणार आहे. ही बस 106 व्या 'इंडियन सायन्स काँग्रेस'मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्मार्ट बस ही पूर्णत: प्रदूषण फ्री असणार असून त्याची किंमत जवळपास सहा लाख असणार आहे. 

देशातील पहिली स्वदेशी अॅन्ड्रॉईड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, मोबाइलपेक्षा लवकर होते चार्ज

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या स्मार्ट बसमध्ये सौर ऊर्जेच्या मदतीने इलेक्ट्रीक मोटर चालते त्यामुळेच कोणतेही प्रदूषण होणार नाही. या बसमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. ताशी 30 किलोमीटर वेगाने चालकाशिवाय ही बस धावणार आहे. स्मार्ट बसची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर या बसमधून 10 ते 30 जण एकाचवेळी 70 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात. 

Web Title: Now there's a 'smart bus' ... charge the battery full, 70 km fir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.