शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तुरूंगात जागा नसल्याने आता मला गोळ्या मारण्याची भाषा करतायेत -  कमल हसन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 07:45 IST

टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात.

चेन्नई - हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून चर्चेत आलेला अभिनेता कमल हसन याने आपल्या विरोधकांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. पण आता तुरूंगातच जागा शिल्लक राहिली नसल्याने ते मला गोळ्या मारून संपवण्याची भाषा करत आहेत अशी खोचक टीका कमल हसनने केली आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कमल हसनचं हे वक्तव्य अखिल भारतीय हिंदू महासभेकडून आलेल्या प्रतिक्रियेनंतर आलं आहे.  कमल हसन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं अखिल भारतीय हिंदू महासभेने काल म्हटलं. 'कमल हसन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही', असं अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा बोलले आहेत. कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू दहशतवादावर परखड मत मांडले होते. पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत, पण आताचे हिंदू हिंसेत सहभागी होतात, अशी टीका त्यांनी केली होती. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीकाही त्यांनी  लेखात केली होती. एका मासिकासाठी त्यांनी हा लेख लिहीला होता. कमल हसन यांच्या टीकेवरुन वाद निर्माण झाला होता. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हसनRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाHinduismहिंदुइझमHindutvaहिंदुत्व