शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आधी चरबी, नंतर गर्मी आणि आता भरतीवर भर; प्रियांका गांधींच्या आश्वासनानंतर नूर पालटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 07:37 IST

अखिलेश यादव, जयंत चौधरी यांनी आगपाखड केल्यानंतर योगींचाही तोल गेला. मतदानानंतर गर्मी उतरवून उत्तर प्रदेशला शिमल्याचा ‘फिल’ देण्याचे सांगताच हे प्रकरण अधिक पेटले. मात्र अलीगढ जिल्ह्यातील इगलास येथे प्रियांका गांधी यांनी  रोड शो दरम्यान गर्मी आणि चरबीचे उत्तर भरतीने दिले. 

गजानन चोपडे -

आगरा : आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी यांनी प्रचार सभेत विरोधकांची चरबी उतरविण्याची भाषा केली तर वसंत पंचमीच्या दिवशी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी गर्मी काढण्याचे सनसनाटी वक्तव्य केल्याने उत्तर प्रदेशचे राजकीय वातावरण तापले. आता मात्र प्रियांका गांधी यांनी नोकर भरती देण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही नेत्यांनी तीच री ओढत प्रियांका यांचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.अखिलेश यादव, जयंत चौधरी यांनी आगपाखड केल्यानंतर योगींचाही तोल गेला. मतदानानंतर गर्मी उतरवून उत्तर प्रदेशला शिमल्याचा ‘फिल’ देण्याचे सांगताच हे प्रकरण अधिक पेटले. मात्र अलीगढ जिल्ह्यातील इगलास येथे प्रियांका गांधी यांनी  रोड शो दरम्यान गर्मी आणि चरबीचे उत्तर भरतीने दिले. 

शेवटच्या दिवशी डोअर टू डोअर प्रचार- पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अनेक नेत्यांनी डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. - भाजप, सपानेही जोरदार प्रचार केला. १० फेब्रुवारी रोजी मेरठ, मुजफ्फरनगर, हापूड, अलीगढसह ११ जिल्ह्यातील ५८ मतदार संघात मतदान होणार आहे.

मुद्दा प्रचारात नव्हता -काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही बेरोजगार तरुणांसाठी भरती अभियान राबविण्याचे आश्वासन देताच भाजप आणि सपा नेत्यांची भाषा बदलली. आता तिन्ही पक्षांनी आपला मोर्चा भरतीचा दिशेने वळविला आहे. याआधी तिन्ही पक्षांनी या मुद्द्याला प्रचारात तितके महत्त्व दिल्याचे दिसून आले नव्हते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा