शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 21:58 IST

डिजिपिन आणि पिनकोड दोन्ही पत्ते ओळखण्यासाठी वापरले जात असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे.

बऱ्याचदा तुम्ही पत्ता लिहिताना किंवा कुणाला तरी सांगताना पिनकोडचा उल्लेख केला असेल. परंतु पिनकोड कसं काम करते माहिती आहे का? हा पिनकोड ६ नंबरचा आकडा असतो जो भारतातील कुठल्याही क्षेत्राला डाक विभागाद्वारे दिलेली ओळख असते. प्रॅक्टिकलपणे एखादे कुरिअर अचूक पत्त्यावर पोहचत नाही ते पाहता भारतीय डाक विभागाने आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे. त्याला डिजिपिन नाव देण्यात आले आहे. याचा हेतून देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे मिळू शकतो. 

काय आहे Digipin?

डिजिपिन हा नवीन पत्ता शोधणारी सिस्टम आहे. डाक विभागाने IIT हैदराबाद आणि ISRO सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. त्याता हेतू भारतातील कुठल्याही ठिकाणाची अचूक ओळख डिजिटपणे करता येईल. त्याला आयडी मिळेल. या संपूर्ण सिस्टम अंतर्गत देशाला ४ मीटर बाय ४ मीटर आकाराच्या छोट्या छोट्या भागात विभाजन केले आहे. प्रत्येक भागाला यूनिक आयडी देण्यात आला आहे. हा आयडी १० आकडी अक्षरांचा एक कोड असेल त्याला डिजिपिन म्हटलं जाते. हा कोड कुठल्याही जागेचा Latitude आणि Longitude वर आधारित असेल. या सिस्टिममुळे एखाद्या गल्लीबोळातील कुठलेही ठिकाणी सहज अचूक मिळू शकते. आता कुठल्याही कुरिअरवाल्याला किंवा व्यक्तीला एखादे पार्सल तुमच्यापर्यंत पोहचवण्यात अडथळा  किंवा समस्या येणार नाही.

पिनकोडपेक्षा Digipin वेगळे कसे?

डिजिपिन आणि पिनकोड दोन्ही पत्ते ओळखण्यासाठी वापरले जात असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. पिनकोड हा ६ अंकी क्रमांक असतो जो खूप मोठ्या परिसराची ओळख पटवतो. डिजिपिन ही एक डिजिटल लोकेशन सिस्टम आहे जी संपूर्ण भारतातील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान ओळखण्यास मदत करते. ज्याप्रमाणे पिन कोड ६ अंकी असतो, त्याचप्रमाणे डिजिपिन हा १० आकड्यांचा किंवा अक्षरांचा कोड असतो. या प्रणालीमध्ये संपूर्ण देश ४x४ मीटरच्या ग्रिडमध्ये विभागलेला असतो आणि त्यानंतर प्रत्येक भागाला १० अक्षरांचा कोड दिला जातो. एकूणच डिजिपिन अधिक अचूक स्थान देतो तर पिन कोड फक्त परिसराबद्दल माहिती देतो.

तुमचा Digipin कसा ओळखाल?

तुम्हाला तुमचा डिजिपिन हवा असेल तर या लिंकवर क्लिक करा..Digipin च्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन तिथे नोंदवू शकता. त्यानंतर सिस्टम तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार १०-अक्षरी युनिक कोड देईल. हा तुमच्या पत्त्याचा डिजिपिन असेल. हा कोड अचूक लोकेशन दर्शवितो. भविष्यात तुम्ही पोस्टल सेवा, ऑनलाइन डिलिव्हरी आणि सरकारी सुविधांसाठी देखील या डिजिपिनचा वापर करू शकता.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस