सहज ट्रान्सफर करता येईल आता रेल्वे आरक्षण तिकीट - शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थीदेखील घेऊ शकतील सुविधेचा लाभ
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
अकोला : जवळच्या नातेवाईकांना कन्फर्म झालेले रेल्वे आरक्षण तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने पूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने यात आणखी बदल करीत ही सुविधा शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी उपल्बध करून दिली आहे.

सहज ट्रान्सफर करता येईल आता रेल्वे आरक्षण तिकीट - शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थीदेखील घेऊ शकतील सुविधेचा लाभ
अ ोला : जवळच्या नातेवाईकांना कन्फर्म झालेले रेल्वे आरक्षण तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने पूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने यात आणखी बदल करीत ही सुविधा शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी उपल्बध करून दिली आहे.रेल्वे आरक्षण तिकीट कन्फर्म असतानादेखील प्रवास करणे शक्य नसल्यास ते तिकीट रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी अशा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीस कन्फर्म असलेले तिकीट ट्रान्सफर करता येऊ शकतं, याबाबत अजूनही अनेकजण अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट करीत, रेल्वे प्रशासनाने ही सुविधा शासकीय कर्मचार्यांना आणि विद्यार्थ्यांसाठीदेखील उपलब्ध केली आहे. यामुळे शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांना आपापसात कन्फर्म आरक्षण तिकीट ट्रान्सफर करता येणार आहे. कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी तिकीटधारकाने मूळ ठिकाणावरून गाडी निघण्याच्या २४ तास अगोदर आरक्षण पर्यवेक्षक (सीआरएस) कडे ओळखपत्रासह अर्ज सादर करण्याची अट रेल्वे प्रशासनाने ठेवली आहे. (प्रतिनिधी)----