शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

आता तयारी अर्थसंकल्पाची, अरुण जेटली यांची अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 15:17 IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर अगदी थोड्याच दिवसांमध्ये वर्ष २०१८ चे अर्थयंकल्पीय अधिवेशन सुरु होईल. अर्थसंकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विविध अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक घेत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर अगदी थोड्याच दिवसांमध्ये वर्ष २०१८ चे अर्थयंकल्पीय अधिवेशन सुरु होईल. अर्थसंकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विविध अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक घेत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. आज झालेल्या या बैठकीत केंद्रीय महसूलसचिव हसमुख अढिया देखिल उपस्थित होते. यापुर्वी जेटली यांनी  कृषी, उद्योग, व्यापार आणि कामगार संघटनेच्या क्षेत्रातील लोकांबरोबर चर्चा केली आहे.

मागच्या बैठकांमध्येही करांच्या रचनेबाबत व दरांबाबत चर्चा झाली होती. कार्पोरेट कर कमी करावेत अशी मागणी सातत्याने होत असून निर्यातदारांनी जीएसटीचा परतावा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी लावून धरली होती. २०१९ साली रालोआ सरकारचा कार्यकाळ संपून सर्व पक्षांना नव्याने निवडणुकांना सामोरे जायचे आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या आदल्या वर्षी म्हणजे २०१८ साली मांडल्या जाणार्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी रालोआला विशेष महत्त्व द्यावे लागणार आहे.

विविध उद्योगसभांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक बळकटी येण्यासाठी पायाभूट सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणूक होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. तसेच सार्वजनिक व परदेशी गुंतवणुकीमुळे रोजगार उपलब्ध होतील असे सांगितले होते. कामगार संघटनांना आश्वासित करताना जेटली यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करणारी पावले उचलली जातील असे सांग्तले होते. या बैठकामध्ये नऊ कामगार संघटनांनी एकत्रितरित्या विविध मागण्यांचे १२ कलमी मागणीपत्र जेटली यांना सादर केले होते.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली