शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

विमान कंपन्यांनी 'श्रद्धेचे मोल' आकाशाला टेकवले; प्रयागराजचे विमान भाडे विदेशापेक्षाही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 22:12 IST

तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे भरलेला महाकुंभ देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय ठरला आहे. प्रत्येक जण पवित्र गंगेत स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहे...

नरेश डोंगरे -नागपूर : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविकांची श्रद्धा ओसंडून वाहत असल्याचे बघून व्यापारी डोक्यांच्या व्यक्तींनी श्रद्धेचे मोल फिक्स केले आहे. पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी भाविकांनी खिसा रिकामा करण्याची तयारी दाखविल्याचे बघून विमान कंपन्यांनी 'श्रद्धेचे मोल' आकाशाला टेकवले आहे. परिणामी प्रयागराजचेविमान प्रवासभाडे दुबई, रोम, लंडनपेक्षाही जास्त झाले आहे.

तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे भरलेला महाकुंभ देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय ठरला आहे. प्रत्येक जण पवित्र गंगेत स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी शक्य असेल त्या वाहनाने प्रयागराज गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वाधिक भाविक रेल्वेने प्रवास करीत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नाही. ते पाहून लाखो भाविक खासगी वाहनाने प्रयागराजकडे धाव घेत आहे. वाहनांची रोज प्रचंड गर्दी होत असल्याने प्रयागराजला जोडणाऱ्या रस्त्यांवर 'महा जाम'ची स्थिती निर्माण झाली आहे. वाहने मुंग्यासारखी सरकताना पाहून अनेक भाविक हवाई मार्गे प्रयागराज गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विमानात प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी चांगलीच वाढली आहे. ते बघून त्यांनी आपल्या प्रवास भाड्यांमध्ये तिप्पट चाैपट वाढ केली आहे.देशांतर्गत विमान प्रवासाचे (घरगुती उड्डाणे) भाडे विदेशी प्रवासापेक्षा २५ ते ५० टक्क्यांपर्यंत (अंतर पाहून) कमी असते. मात्र, प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने विमान कंपन्यांनी ही मर्यादा ओलांडून घरगुती उड्डाणाचे भाडे विदेशापेक्षाही जास्त केले आहे. सहा ते सात हजारांचे भाडे २२ ते ३३ हजारांवर नेऊन ठेवले आहे. श्रद्धेपुढे पैशाला किंमत नसल्याची भावना असल्याने अनेक भाविक या प्रचंड भाववाढीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचे चांगलेच फावले आहे.((१))

विमानाचे शुक्रवार १४ फेब्रुवारीचे दरनागपूर - प्रयागराज - २१,९००पुणे - प्रयागराज - ३३,५००

मुंबई - प्रयागराज - २८,५००औरंगाबाद - प्रयागराज - ३१,२००

दिल्ली - प्रयागराज - १४,५००((२))शनिवार १५ फेब्रुवारीचे दर

नागपूर - प्रयागराज - २०,५००पुणे - प्रयागराज - २५,०००मुंबई - प्रयागराज - ३३,०००औरंगाबाद - प्रयागराज ४१,१००दिल्ली - प्रयागराज - १३,६००

((३))विदेश वारीचे दर

नागपूर - लंडन - २८, २००नागपूर - दुबई - ११,८८३

नागपूर - हाँगकाँग -१५६९३

नागपूर - बाली - -२०,१७७

नागपूर - रोम २६,४६८

नागपूर - मास्को - ५४,५७४

नागपूर - बँकाँक -११४५२ 

टॅग्स :airplaneविमानPrayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळा