शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नागरी सहकारी बँकांवर आता नेमण्यात येणार तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:00 AM

रिझर्व्ह बँकेच्या सूचना; कर्जवाटपावर येणार निर्बंध

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेतील घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांच्या कर्जवाटपावर काही निर्बंध आणले आहेत. उद्योग व उद्योग समूहांना कर्जे कशी द्यायची, याबाबत नियम घालून देतानाच, रिझर्व्ह बँकेने १00 कोटींहून अधिक ठेवी असणाऱ्या नागरी बँकांना तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ नेमण्याचा आदेश दिला आहे.या व्यवस्थापन मंडळांमुळे बँकांचे काम अधिक पारदर्शकपणे तसेच व्यावसायिकरीत्या चालेल, अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. या तज्ज्ञांच्या व्यवस्यापन मंडळांमुळे सध्याच्या संचालकांच्या मनमानी कारभारावर अंकुश येणार आहे. येत्या वर्षभरात १00 कोटींहून अधिक ठेवी असणाºया सर्व नागरी सहकारी बँकांना तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ नेमावे लागणार आहे. आरबीआयकडून तशा प्रकारच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.नागरी बँकांची स्थिती, त्यांचा कारभार व व्यवसाय, कर्जेवाटपाची पद्धत आणि त्यात करावयाच्या सुधारणा यांसाठी रिझर्व्ह बँकेने आर. गांधी यांची पूर्वीच समिती नियुक्त केली होती. त्या समितीने आधीच आपला अहवाल केला सादर केला होता. पण पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने या अहवालातील काही शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे ठरविले असून, तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ हा त्याचाच भाग आहे.नागरी सहकारी बँकांमध्ये सध्या संचालक मंडळच सारे निर्णय घेते. पण सहकारी संस्था व सहकारी बँका यांच्या कामात फरक असल्याने या बँकांचे काम अधिक व्यावसायिक पद्धतीने चालायला हवे. त्याबरोबरच त्यात हजारो वा लाखो लोकांच्या ठेवी असल्याने त्यांच्या हितांचे रक्षण व्हायला हवे, या हेतूने व्यवस्थापन मंडळाची शिफारस करण्यात आली होती. बँकांचे संचालक हे बँकिंगमधील तज्ज्ञ असतातच, असे नव्हे. अनेकदा त्यांना त्या विषयाची माहितीही नसते. त्यामुळे अनेकदा बँका अडचणीत येतात. तसे प्रकार टाळणे, हा व्यवस्थापन मंडळ नेमण्यामागील उद्देश आहे.संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांवरही या तज्ज्ञांच्या मंडळांचा अंकुश राहील. संचालक मंडळाचे निर्णयही प्रसंगी व्यवस्थापन मंडळ बदलू शकेल, असे अधिकार त्यांना असतील. संचालक मंडळांना धोरणे ठरविताना आणि निर्णय घेतानाही व्यवस्थापन मंडळ मदत करेल. याचाच अर्थ या मंडळामार्फत मोठ्या नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहणार आहे.मतदानाचा अधिकार नाहीनागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापन मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच किमान पाच ते कमाल १२ सदस्य असतील. त्यांना निर्णयप्रक्रियेत मतदानाचा अधिकार नसेल. मुख्य कार्यकारी अधिकारी वा व्यवस्थापन मंडळातील सदस्य यांनी ठेवीदारांच्या रक्षणाविरोधात वा रिझर्व्ह बँकेच्या धोरणाविरोधात निर्णय घेतल्यास त्यांना तेथून हटविण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला असेल.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक