शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आता मृत्यूची वेळ आधी कळणार; गुगलच्या मशीनचा अद्भुत 'चमत्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:37 IST

आता रुग्णाच्या जगण्याची शक्यता आहे की नाही?, शिवाय त्याचा मृत्यू कधी होणार?, हे सांगणार एक नवीन मशीन विकसित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - एखाद्या दुर्धर आजाराचा सामना करणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीनं कधीच आपल्याला सोडून जाऊ नये, त्या खास व्यक्तीनं कायम आपल्यासोबत राहावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आजारामुळे होणाऱ्या यातनेतूनदेखील त्या व्यक्तीची मुक्तता व्हावी, अशीही प्रार्थना आपण करत असतो. अशातच, ती किती दिवसांची सोबती आहे, या विचारानं आपण आतून पोखरले जातो. मात्र, आता रुग्णाच्या जगण्याची शक्यता आहे की नाही?, शिवाय रुग्णाचा मृत्यू कधी होणार?, हे सांगणार एक नवीन मशीन विकसित करण्यात आले आहे. सर्च इंजिन गुगलनं नुकतेच एक असे एक मशीन विकसित केले आहे, ज्याद्वारे रुग्णाच्या आजाराच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर त्या रुग्णाकडे जगण्यासाठी किती कालावधी उरला आहे, याची माहिती समजू शकणार आहे. 

या मशीनवर आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचे प्रमुख जेफ डीन यांची 'मेडिकल ब्रेन' कंपनी काम करत आहे. हे मशीन रुग्णांच्या आजाराच्या लक्षणांचं परीक्षण करुन त्याआधारे रुग्णाच्या जगण्याबाबतची शक्यता सांगेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डीन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नुकतेच या मशीनद्वारे एका महिला रुग्णाचे परीक्षण करण्यात आले. ब्रेस्ट कॅन्सरनं पीडित असलेल्या या महिलेच्या डॉक्टरांनी काही वैद्यकीय तपासण्या केल्या. तपासणीत समोर आलेल्या आजाराच्या लक्षणांच्या आधारे महिला रुग्णाची केवळ 9.3 टक्के जगण्याची शक्यता वर्तवण्यात आली. याच माहितीवर गुगल मशीननं काम सुरू केले. गुगलनं विकसित केलेल्या मशीननं संबंधित महिलेच्या जगण्याची 19.9 टक्के शक्यता वर्तवली. यानंतर काही दिवसांतच महिलेचा मृत्यू झाला. यानंतर वैद्यकीय तज्ज्ञदेखील अचंबित झाले असून या नवीन मशीनमुळे ते प्रभावित झालेत. विशेष म्हणजे ज्या अहवालांच्या आधारे महिलेच्या मृत्यूसंदर्भातील शक्यता वर्तवण्यात आली, ते सर्व अहवालदेखील गुगलनं सादर केले.

जेफ डीन यांनी मशीनबाबत सांगितले की, जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा व्हावा, या उद्देशानं जगभरातील दवाखान्यांमध्ये ही यंत्रणा पोहोचण्याचे गुगलचे पुढील पाऊल असणार आहे. डीन यांच्यानुसार, आर्टिफिशिअल इन्टेलिजेन्स यंत्रणा आजारांचा शोध घेणे आणि त्यासंबंधी औषधोपचारांसाठी डॉक्टरांची मदत करत आहे. 

टॅग्स :googleगुगलDeathमृत्यू