शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅक ऑफिस’ नाही, आता जगाचा कारखाना म्हणून भारताचा उदय: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 06:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचे आता यश येत आहे, कारण भारतीय उत्पादने जागतिकस्तरावर पोहोचत आहेत आणि जगभरात त्यांची उपस्थिती जाणवत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : “काही वर्षांपूर्वी मी ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल फॉर ग्लोबल’ ही कल्पना देशासमोर मांडली होती आणि आज आपण ही कल्पना प्रत्यक्षात उतरताना पाहत आहोत. अनेक दशकांपासून जग भारताला आपले ‘बॅक ऑफिस’ म्हणत आहे. आता भारत जगाचा नवा कारखाना बनत आहे. आपण  एक जागतिक शक्ती बनत आहोत,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते ‘एनएक्सटी’ परिषदेत ‘न्यूजएक्स वर्ल्ड’ चॅनेलचे उद्घाटन करताना मोदी बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचे आता यश येत आहे, कारण भारतीय उत्पादने जागतिकस्तरावर पोहोचत आहेत आणि जगभरात त्यांची उपस्थिती जाणवत आहे. 

पंतप्रधान काय म्हणाले...

पंतप्रधान म्हणाले की, भारताचे वाढते संरक्षण उत्पादन जगासमोर त्याचे अभियांत्रिकी आणि तांत्रिक कौशल्य प्रदर्शित करते. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ऑटोमोबाइल क्षेत्रापर्यंत, जगाने भारताचे प्रमाण आणि क्षमता पाहिली आहे. भारत केवळ जगाला उत्पादने पुरवत नाही तर जागतिक पुरवठा साखळीत एक खात्रीशीर आणि विश्वासार्ह भागीदार बनत आहे.

बजेट अंमलबजावणी, मार्ग सुचवा!

कृषी आणि ग्रामीण विकासासाठी चालू योजना अधिक प्रभावी करण्यासाठी आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  पंतप्रधान म्हणाले की, शेती विकासाचे पहिले इंजिन मानले जाते. सरकार कृषी विकास व ग्रामीण समृद्धी साध्य करण्याच्या ध्येयाने पुढे जात आहे. अर्थसंकल्प तयार झाला. भागधारकांनी अंमलबजावणीतील ‘अडथळे आणि कमतरता’ ओळखल्या पाहिजेत. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार