आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 07:05 PM2017-11-17T19:05:20+5:302017-11-17T19:08:03+5:30

भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे.

Now do the Midnight Celebration, Yashwant Singh's Jaitley | आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला

आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला

googlenewsNext

नवी दिल्ली - भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. मूडीजच्या रेटिंगमुळे उत्साहित असलेल्या जेटली यांनी ज्यांना आर्थिक सुधारणेबाबत शंका आहे, त्यांनी स्वत:चे गंभीर आकलन केले पाहिजे असा टोला यशवंत सिन्हा यांना लगावला होता. त्याला सिन्हा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 
मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केल्यानंतरही यशवंत सिन्हा यांच्या शंकांचे निरसन झालेले नाही. त्यांनी मूडीजच्या रेटिंगनंतर सरकारने व्यक्त केलेल्या आनंदावर आक्षेप घेतला आहे. मूडिजने रेटिंगमध्ये सुधारणा केल्याने आता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यास हरकत नाही असा तिरकस टोला त्यांनी लगावला.   
" मूडीडने भारताच्या मानांकनात केलेल्या सुधारणेचे आम्ही स्वागत करतो. केंद्रात सत्तेवर असलेल्या आमच्या सरकारने गेल्या काही वर्षांत आर्थिक सुधारणा करण्यासाठी उचललेल्या सकारात्मक पावलांचा परिणाम या बदललेल्या रेटिंगमध्ये दिसून आला आहे. या बदललेल्या रेटिंगमुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल." असे मूडीजच्या रेटिंगवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुण जेटली म्हणाले होते. तसेच त्यांनी यशवंत सिन्हांनाही टोला लगावला होता. 
आंतरराष्ट्रीय रेटिंग्ज एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने  'मूडीज्'ने हा निर्णय घेतला आहे.  
या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2  करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे. 
"भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल" असे 'मूडीज्'ने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
जीएसटी आणि नोटाबंदी निर्णयामुळे उद्योगावर परिणाम झाला, अशी सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला या मुद्यावर गेले वर्ष धारेवर धरले असताना 'मूडीज्'ने वाढवलेले रेटिंग सरकारला दिलासादायक ठरणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुजरात निवडणुकांमध्ये याचा उपयोग नरेंद्र मोदी यांचे सरकार निश्चितच या मुद्याचं उपयोग करुन घेईल. याआधीही उद्यम सुलभतेत भारताने उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल केंद्र सरकारला जगातिक संस्थांची शाबासकी मिळाली आहे. 
 

Web Title: Now do the Midnight Celebration, Yashwant Singh's Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.