शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता पाणबुडी खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 04:41 IST

मोदी सरकार परिस्थिती बदलू पहात आहे

शीलेश शर्मा नवी दिल्ली : संरक्षण साहित्याच्या व्यवहारांवरून काँग्रेसने आणखी एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आहे. पक्षाने आरोप केला की, पाणबुडी खरेदीत मोदी सरकार नियमांना डावलून पक्षपाती निर्णय घेत आहे म्हणजे अदानी समूहाला थेट लाभ देता येऊ शकेल.काँग्रेसने असाही आरोप केला की, संरक्षण खरेदी प्रक्रियेचा लाभ पोहचवण्यासाठी थेट उल्लंघन करून सोबतच भारतीय नौदल आणि त्याच्या अधिकार प्राप्त समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणजे पाणबुड्यांचा हा व्यवहार (तो जवळपास ४५ हजार कोटी रूपयांचा आहे) थेट अडानींच्या खिशात घालता येईल.

काँग्रेसने बुधवारी दस्तावेज जारी करताना म्हटले की, या खरेदीसाठी जे पात्रतेचे निकष तयार होते त्यांनाही मोदी सरकारने बाजुला केले गेले. कारण ते तोडल्याशिवाय भांडवलदार मित्रांना मदत करणे शक्य नाही. मोदी सरकार अडानी डिफेन्स संयुक्त उपक्रमाची पात्रता नसल्यामुळे नौदल आणि त्याच्या अधिकार प्राप्त समितीचे निर्णय रद्द करीत आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला आणि जयवीर शेरगिल यांनी याच्याशी संबंधित दस्तावेज जाहीर करताना स्पष्ट केले की, ४५ हजार कोटी रूपयांच्या खरेदी व्यवहारासाठी पाच अर्ज संरक्षण मंत्रालयाला मिळाले. त्यात लार्सन अँड टुब्रो, माझगाव डॉक शिप बिर्ल्डस, रिलायन्स, हिंदुस्थान शिपयार्ड आणि अडानी डिफेन्स तथा हिंदुस्थान शिपयार्डचा संयुक्त उपक्रमाचा समावेश होता.

मोदी सरकार परिस्थिती बदलू पहात आहेअडानी समुहाकडे पाणबुडी बनवण्याचा कोणताही अनुभव नाही हे माहीत असूनही अधिकार प्राप्त समितीने तथ्यांच्या आधारे जे निर्णय घेतले ते आता मोदी सरकार बदलून अशी परिस्थिती निर्माण करीत आहे की अडानीचा अर्ज स्वीकारता येईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस