शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर'नाटका'चा नवा प्रयोग आता गोव्यात; सत्तास्थापनेसाठी काँग्रेस करणार दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 18:55 IST

काँग्रेसने कर्नाटकातील राज्यपालांच्या निर्णयाप्रमाणेच देशातील इतर राज्यांमध्ये न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

बेंगळुरु- कर्नाटकात सर्वात जास्त सदस्य निवडून आणणाऱ्या पक्षाला म्हणजे भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावल्यानंतर राज्यामध्ये त्याचे पडसाद अजून उमटत आहेत सर्वोच्च न्यायालयासह सर्व दरवाजे ठोठावल्यानंतर काँग्रेसने याचा पुढचा अंक गोव्यात घेण्याचे ठरवले आहे. गोव्यामध्ये काँग्रेसला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त म्हणजे 16 जागा मिळाल्या होत्या.काँग्रेसने आता गोव्यात 16 आमदारांच्या पत्रांसह राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याचे निश्चित केले आहे. त्याबरोबरच मणिपूर आणि मेघालयामध्येही काँग्रेस असा दावा करेल. इतकेच नव्हे तर बिहारमध्ये राजदही आपण सर्वात जास्त सदस्यांचा पक्ष असल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आपल्याला राज्यपालांनी बोलवावे अशी विनंती करु शकतो. राजदचे नेते आणि लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी कालच  ट्वीट करुन कर्नाटकाचा न्याय आम्हाला लावून राजद आणि काँग्रेसला बिहारमध्ये सत्ता स्थापन करु द्यायला हवी असे मत मांडले होते.गोव्यामध्ये बहुमतासाठी काँग्रेसला 4 जागा कमी पडत होत्या. भाजपाला 40 जागांच्या विधानसभेत 14 जागा मिळाल्या होत्या. भाजपाने गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या साहाय्याने सत्ता स्थापन केली होती. कर्नाटकात राज्यपाल वजूभाई वाला अँग्लो इंडियन समुदायाच्या सदस्याची नेमणूक विधानसभेत करु शकतात, त्य़ामुळे भाजपाला एक सदस्याचे आणखी पाठबळ मिळेल म्हणून जेडीएस आणि काँग्रेस अॅंग्लो इंडियन सदस्याची नेमणूक रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार