पैठणमधील अतिक्रमणधारकांना नोटिसा

By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30

पैठणमधील अतिक्रमणधारकांना नोटिसा

Notices to encroachment holders of Paithan | पैठणमधील अतिक्रमणधारकांना नोटिसा

पैठणमधील अतिक्रमणधारकांना नोटिसा

ठणमधील अतिक्रमणधारकांना नोटिसा
पैठण(जि़ औरंगाबाद) : जायकवाडी धरणासाठी संपादित केलेल्या आणि वसाहतींना लागून असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. नागरिकांनी अतिक्रमण स्वत:हून काढून कारवाई टाळावी असे आवाहन कार्यकरी अभियंता संजय भार्गोदेव यांनी केले आहे.
हे अतिक्रमण हटविण्याबाबल जलसंपदा विभागाला जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहे. त्यानुसार जायकवाडी प्रशासनाने दखल घेत सर्व अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावल्या आहे.
जायकवाडीसाठी संपादीत करण्यात आलेल्या परंतु धरणाच्या वापरात न घेतलेल्या जमिनीवर परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहत आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी पक्की घरे आणि व्यवसायिक प्रतिष्ठान उभे केले आहे.
अतिक्रमणाच्या जागेवरून झालेल्या वादानंतर या अतिक्र मणाबाबत शासन दरबारी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर २००८ पासून जायकवाडी प्रशासन सातत्याने अतिक्रमण काढून घेण्याबाबत नागरिकांना नोटिसा बजावत आहे. मात्र तरीही नागरिकांनी आपली अतिक्रमणे काढली नव्हती. दरम्यान, पैठण-औरंगाबाद रस्त्यालगत मौजे कातपूर शिवारातील सर्वे नं. १२७ मधील झालेले अतिक्र मण हटविण्यासाठी सहायक कार्यकारी अभियंता दगडी धरण उप विभाग क्र. १ यांनी अतिक्र मणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्र मण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखलही करण्यात आला आहे. तहसिलदार संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिक्रमण हटविण्यात येईल असे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Notices to encroachment holders of Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.