सा.बां.च्या तीन अभियंत्यांना जिल्हाधिकार्‍यांकडून नोटीस

By Admin | Updated: February 21, 2016 00:31 IST2016-02-21T00:31:20+5:302016-02-21T00:31:20+5:30

जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या तीन लाखाच्या आतच्या निविदी पाठविल्यामुळे सा.बां. विभागाच्या तीन अभियंत्यांना नोटीस बजावल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

Notice from the District Collector | सा.बां.च्या तीन अभियंत्यांना जिल्हाधिकार्‍यांकडून नोटीस

सा.बां.च्या तीन अभियंत्यांना जिल्हाधिकार्‍यांकडून नोटीस

गाव : जलयुक्त शिवार योजनेच्या तीन लाखाच्या आतच्या निविदी पाठविल्यामुळे सा.बां. विभागाच्या तीन अभियंत्यांना नोटीस बजावल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
जलयुक्त शिवार योजनेमध्ये अनेक ठिकाणी तीन लाखाच्या आतच्या कामाच्या निविदा भरण्यात आल्या. त्याचा प्रस्ताव संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. मात्र तीन लाखाच्या आतची कामे यामध्ये नसल्याने अशा निविदा कशा स्विकारल्या व त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना सा.बां. विभागाच्या तीन अभियंत्यांना नोटीस बजावल्या.

काम दर्जेदार झाले पाहिजे...
तीन लाखाच्या आतच्या निविदा स्विकारु नये, अशा सूचना देत तीन लाखाच्यावरही जे काम करणार आहे, तेही दर्जेदार झाले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

Web Title: Notice from the District Collector