पनवेलमधील २८ बारमालकांना नोटिसा

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:13+5:302015-03-20T22:40:13+5:30

नियमांचे उल्लंघन : सहाय्यक पोलिस आयुक्तांची कारवाई

Notice to 28 Barker in Panvel | पनवेलमधील २८ बारमालकांना नोटिसा

पनवेलमधील २८ बारमालकांना नोटिसा

यमांचे उल्लंघन : सहाय्यक पोलिस आयुक्तांची कारवाई
पनवेल : येथील काही बारमध्ये खाद्यगृह परवाना अटी-शर्तींचे उल्लंघन करण्यात येत आहे. यासंदर्भात बारमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. पनवेलमधील एकूण २८ बारमालकांना अशाप्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पनवेलमध्ये डान्सबारची संख्या जास्त असून याठिकाणी २८ बारना लेडीज सर्व्हिस परवाना आहे, तर इतर १२ बारना ऑर्केस्ट्रा परवाना आहे. या बारमालकांना सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून खाद्यगृह व जिल्हाधिकार्‍यांकडून एफएलचा परवाना घ्यावा लागतो. या परवान्यांचे नूतनीकरण करणे गरजेचे असून खाद्यगृह परवान्यात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने अशाप्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या त्रुटीत अन्न व औषध प्रशासनाचा परवाना, किचनमध्ये काम करणार्‍या कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, वजन आणि माप विभागाचे प्रमाणपत्र या गोष्टी नूतनीकरणासाठी लागतात. बारमध्ये काम करणार्‍या सर्वच कामगारांचे पोलिसांकडून नोकरनामे तयार करणे बंधनकारक आहेत तसेच वीजजोडणीचे प्रमाणपत्र, सीसीटीव्ही बसविला की नाही याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून हा आक्षेप घेण्यात आला आहे. संबंधित सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी या बारमालकांना ठराविक कालावधीची मुदत देण्यात आली असून त्यात त्यांची बाजू स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Notice to 28 Barker in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.