पाक नव्हे, चीनपासून भारताला धोका
By Admin | Updated: August 23, 2014 00:30 IST2014-08-23T00:30:55+5:302014-08-23T00:30:55+5:30
भारताला पाकिस्तानपासून नव्हे, तर खरा धोका चीनपासून असल्याचे प्रतिपादन पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य भारत कर्नाड यांनी येथे केले.

पाक नव्हे, चीनपासून भारताला धोका
पणजी : भारताला पाकिस्तानपासून नव्हे, तर खरा धोका चीनपासून असल्याचे प्रतिपादन पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य भारत कर्नाड यांनी येथे केले. पाकिस्तान केवळ उपद्रव आहे. खरे तर पाकला आण्विक तंत्रज्ञान पुरविणा:या चीनपासूनच भारताने सावध राहायला हवे, असे ते म्हणाले.
फोरम फॉर इंटेग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी (फिन्स) या संस्थेच्या गोवा शाखेतर्फे येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मिनेङिास ब्रागांझा सभागृहात आयोजित ‘देशाच्या सुरक्षेत अण्वस्नंचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. भारताविरुद्ध चीनच पाकला ‘प्रॉक्सी’ म्हणून वापरत आहे, असा आरोपही कर्नाड यांनी केला. ते म्हणाले की, चीनने पाकला अणुबॉम्ब बनविण्याचे साहित्य दिले, चार अणुभट्टय़ाही दिल्या आहेत. भारत आपल्याविरुद्ध अण्वस्नंचा वापर करणार नाही याची खात्री पाकला आहे. पाकचे निवृत्त लष्करप्रमुख खलिद मेहमूद अरिफ यांच्याशी झालेल्या चर्चेतून हे जाणवल्याचे कर्नाड म्हणाले.