बलात्कार सांगून होत नाही, मध्यप्रदेशमधील गृहमंत्री बरळले
By Admin | Updated: June 5, 2014 15:03 IST2014-06-05T15:03:53+5:302014-06-05T15:03:53+5:30
बलात्काराच्या घटना सांगून होत नाही. या घटना एकांतात घडत असल्याने त्या रोखणे शक्य नसते अशी मुक्ताफळे मध्यप्रदेशमधील भाजप नेते व गृहमंत्री बाबूलाल गौड यांनी उधळली आहे.

बलात्कार सांगून होत नाही, मध्यप्रदेशमधील गृहमंत्री बरळले
ऑनलाइन टीम
भोपाळ, दि. ५ - बलात्काराच्या घटना सांगून होत नाही. या घटना एकांतात घडत असल्याने त्या रोखणे शक्य नसते अशी मुक्ताफळे मध्यप्रदेशमधील भाजप नेते व गृहमंत्री बाबूलाल गौड यांनी उधळली आहे. या घटना रोखण्यासाठी मुलींनीच कराटे व ज्यूदोचे प्रशिक्षण घ्यावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
उत्तरप्रदेशपेक्षा मध्यप्रदेशमध्ये बलात्काराच्या घटना जास्त घडतात. पण प्रसारमाध्यमे फक्त उत्तरप्रदेशमधील घटनाच दाखवतात असा आरोप उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षाने केला होता. यासंदर्भात मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्याशी गुरुवारी काही पत्रकारांनी संवाद साधला. बलात्काराच्या घटनांवरुन सरकारी यंत्रणांची पाठराखण करताना गौड यांची जीभ घसरली. गौड म्हणाले, बलात्कार ही एक सामाजिक विकृत असून या घटना एकांतात घटना. बलात्कार करणारा व्यक्ती तो बलात्कार करायला जातोय असे सांगून जात नाही.
बलात्कारप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार केल्यास आम्ही कारवाई करु असे गौड यांनी सांगितले. दरम्यान, भाजपने गौड यांचे विधान वैयक्तिक मत असल्याचे सांगितले आहे.तर काँग्रेसने गौड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.