'नोकऱ्यांचा नव्हे, तर लायक उमेदवारांचा तुटवडा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:20 AM2019-09-16T06:20:00+5:302019-09-16T06:20:51+5:30

देशात नोकऱ्यांचा तुटवडा नाही, पण ज्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी खास करून उत्तर भारतात कुशल माणसे मिळत नाहीत, असे केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी म्हटले आहे.

Not for jobs, but for qualified candidates by central cabinet minister | 'नोकऱ्यांचा नव्हे, तर लायक उमेदवारांचा तुटवडा'

'नोकऱ्यांचा नव्हे, तर लायक उमेदवारांचा तुटवडा'

Next

लखनऊ : देशात नोकऱ्यांचा तुटवडा नाही, पण ज्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी खास करून उत्तर भारतात कुशल माणसे मिळत नाहीत, असे केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी म्हटले आहे.
द्वितीय मोदी सरकारने १०० दिवस पूर्ण केल्यानिमित्त येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गंगवार म्हणाले की, हल्ली रोजगारासंबंधीच्या बातम्यांनी वृत्तपत्रे भरलेली असतात, पण काळजी करण्यासारखे काही नाही. आमचे सरकार याकडे बारकाईने लक्ष देत असून, रोजगार वाढविण्यासाठी काम करत असल्याने रोजगाराचे प्रमाण घटत असल्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. (वृत्तसंस्था)
>देशात रोजगारांचा तुटवडा नाही, पण (खास करून) उत्तर भारतात जे नोकर भरती करण्यासाठी येतात, त्यांच्याकडून नेहमी हे ऐकायला मिळते की, आम्हाला ज्या पदासाठी माणूस हवा असतो, त्या दर्जाचे उमेदवार खूपच कमी मिळतात.
- संतोष कुमार गंगवाल, केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री
>सरकार जबाबदारी टाळू पाहात आहे; प्रियांका गांधी यांनी केली टीका
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गंगवार यांच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. प्रियांका यांनी टिष्ट्वटरवर लिहिले: तुमचे सरकार पाच वर्षांहून अधिका काळ सत्तेवर आहे, पण रोजगार काही निर्माण झाले नाहीत. ज्या काही थोड्या-बहुत नोकºया आहेत, त्याही सरकारने लादलेल्या आर्थिक मंदीने हिरावून घेतल्या जात आहेत. सरकार काहीतरी चांगले करेल, याची देशातील तरुण पिढी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही उत्तर भारतीयांचा अपमान करून जबाबदारी टाळू पाहात आहात, हे खपवून घेतले जाणार नाही.

Web Title: Not for jobs, but for qualified candidates by central cabinet minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी