शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

इंडिया नव्हे,‘भारत’च?; विशेष अधिवेशनात विधेयक? राष्ट्रपतींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 06:19 IST

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

- संजय शर्मानवी दिल्ली : देशाचे नाव आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० देशांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा करण्यात आला आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

किती देशांनी बदलले नाव? आतापर्यंत सिलोनचे श्रीलंका, बेचुयानालँडचे बोत्सवाना, एबिसिनियाचे इथिओपिया, ट्राजार्डेनचे जॉर्डन, बर्माचे म्यानमार, तुर्कीएचे तुर्की, हॉलंडचे नेदरलँड, फारसचे इराण व सियामचे थायलँड असे नामांतर झाले.

आरोप-प्रत्यारोप ‘भारत’ नावावर राजकीय वादही सुरू झाला आहे. विरोधी पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप व राजदने यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘इंडिया’ आघाडीला घाबरूनच देशाच्या नावातून ‘इंडिया’ हटवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ‘इंडिया’ हे नाव विरोधकांच्या आघाडीला जोडले गेल्यामुळे नेत्यांवर किंवा आघाडीवर थेट हल्लाबोल करता येत नाही, ही बाब भाजप नेत्यांनीही स्वीकारली आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आघाडीला आपल्या भाषेत ‘घमंडिया आघाडी’ हे नाव दिले आहे.

मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर

संसदेचे विशेष अधिवेशन अचानक का बोलावले, याचा अजेंडा आता स्पष्ट होत आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा रंगली असतानाच आता देशाचे नाव बदलण्याची तयारी केली जात आहे. त्याचा प्रत्यय जी-२० च्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा केला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील लोकांनी जगात कुठेही गेले, तरी स्वत:ला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ देशाचा नागरिक म्हणण्यास सुरुवात करावी, असे म्हटले होते. त्याच अनुषंगाने विशेष अधिवेशनात प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली जात आहे.

देशाच्या सन्मान आणि गौरवाशी निगडित प्रत्येक विषयावर काँग्रेस दरवेळी का आक्षेप घेते? भारत जोडो नावाने यात्रा करणाऱ्यांना ‘भारतमाता की जय’ उद्घोष करणाऱ्यांविरोधात इतका द्वेष का?     - जगत प्रकाश नड्डा, अध्यक्ष, भाजपइंडिया म्हणजेच भारत, हे संघराज्य आहे. एक देश, एक निवडणूक हा संघराज्य प्रणाली व त्याच्या सर्व राज्यांवर हल्ला आहे.    - राहुल गांधी, काँग्रेस नेते.‘इंडिया’ हा भारत आहे, त्यामुळे अचानक असे काय झाले की, देशाने फक्त भारतच म्हणायला हवे. आपण देशाला भारत म्हणतो, इंग्रजीत ‘इंडिया’. त्यात नवीन काही नाही. देशात इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे.    - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल सध्या जनतेत ‘इंडिया’ला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाव काढण्याचा प्रयत्न केला जात असेल. मात्र, इंडिया हे नाव हटविण्याचा कोणालाही अधिकार नाही.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस