शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:22 IST

Haryana Assembly Election 2024: हरियाणात सत्तांतराची चाहूल लागलेल्या काँग्रेसमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यात भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून जुगलबंदी रंगलेली असतानाच काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी आज आपल्या महत्त्वाकांक्षेबाबत सूचक विधान केलं आहे.

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेलं मतदान काही वेळातच समाप्त होणार आहेत. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र राज्यात सत्तांतराची चाहूल लागलेल्या काँग्रेसमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यात भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून जुगलबंदी रंगलेली असतानाच काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी आज आपल्या महत्त्वाकांक्षेबाबत सूचक विधान केलं आहे. निवडणूक लढवली नाही, याचा अर्थ सरकार चालवण्याची महत्त्वाकांक्षा नाही, असा होत नाही. तसेच मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणे गैर नाही, असेही सुरजेवाला म्हणाले. 

आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर सुरजेवाला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, निवडणूक लढवली नाही याचा अर्थ सरकार चालवण्याची महत्त्वाकांक्षा नाही आहे, असा होत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराकडे हरियाणामध्ये परिवर्तन आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समाधान आणण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. माझ्याकडे हरियाणाच्या विकासासाठीचा दृष्टीकोन आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणं हे काही गैर नाही, असेही सुरजेवाला यांनी सांगितले. मात्र वैयक्तिक महत्त्वाकांक्षा ही पक्षाच्या शिस्तीपेक्षा मोठी नाही. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल. हे मत मी भूपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि इतरांच्यावतीनेही मांडत आहेत असेही त्यांनी सांगितले. राज्यातील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळले आहेत. शेतकरी, तरुण, पैलवान आणि जवान सर्वांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे राज्यात क्रांतिकारी परिवर्तन दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले की, माझं सर्वप्रथम प्राधान्य हे कैथलचा विकास करण्याला असेल. रणदीप सुरजेवाला हे विधानसभेची निवडणूक लढवत नसले तरी त्यांचे पुत्र आदित्य सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. कैथल हा सुरजेवाला कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आदित्य सुरजेवाला यांचा सामना भाजपा आमदार लीला राम यांच्याशी होत आहे.  

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री