शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व मुस्लिम महिला दहशतवादी नाहीत; शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीला आठवलेंचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 10:40 IST

देशात बुरखा, नकाबवर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई: बुरखा, नकाबवर बंदी घातली जावी, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. तशी मागणीदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी याला विरोध केला आहे. बुरखा परिधान करणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते, असं आठवलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे बुरख्यावरुन महायुतीतली मतमतांतरं समोर आली आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मुखपत्र सामनाच्या माध्यमातून शिवसेनेकडून ही मागणी करण्यात आली. मात्र एनडीएतील घटक पक्ष असलेल्या रिपाईंनं या विरोधात भूमिका घेतली आहे. 'बुरखा घालणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते. जर त्या दहशतवादी असतील, तर त्यांचा बुरखा काढण्यात यावा. बुरखा हा परंपरेचा भाग आहे. त्यामुळे तो परिधान करणं हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे. त्यामुळे देशात बुरख्यावर बंदी आणली जाऊ नये,' अशा शब्दांमध्ये आठवलेंनी रिपाईंची भूमिका स्पष्ट केली. 

श्रीलंकेत बॉम्ब स्फोट झाल्यानंतर तिथल्या सरकारनं बुरख्यावर बंदी घातली. त्याचा संदर्भ देत भारतातही अशा प्रकारची बंदी लागू करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली. यावेळी शिवसेनेनं इतर देशांमध्ये घालण्यात आलेल्या बंदीचाही संदर्भ दिला. 'फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का?' असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला.
'फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न,' असं शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMuslimमुस्लीमRamdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीsri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोट