काश्मीर खोऱ्यात सामान्य व्यवहार विस्कळीतच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:45 AM2019-09-26T02:45:55+5:302019-09-26T06:58:06+5:30

सार्वजनिक वाहतूक बंद; शाळकरी मुले राहिली घरीच

Normal transactions in the Kashmir Valley are disrupted | काश्मीर खोऱ्यात सामान्य व्यवहार विस्कळीतच

काश्मीर खोऱ्यात सामान्य व्यवहार विस्कळीतच

Next

श्रीनगर : काश्मीर खोºयात बुधवारी सलग ५२ व्या दिवशी सर्वसामान्य व्यवहारांवर परिणाम झालेलाच होता. सार्वजनिक वाहतूक होऊ शकली नाही, तर येथे काही मोजक्याच विक्रेत्यांनी आपली दुकाने लावली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्य बाजारपेठा आणि इतर व्यावसायिक आस्थापना बंदच होत्या. तथापि, येथील टीआरसी चौक-लाल चौकात काही विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. सार्वजनिक वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणावर बंद होती. मात्र, आंतरजिल्हा कॅब्ज आणि काही ऑटोरिक्षा शहरातील काही भागांत जा-ये करताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. खासगी कार्सची वाहतूक मात्र कोणत्याही अडथळ्याविना सुरू होती. राज्य सरकारने शैक्षणिक संस्था उघडण्याच्या केलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही. कारण शाळांमध्ये वर्गच झाले नाहीत. कारण पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेची खात्री नसल्यामुळे त्यांना घरीच राहू दिले.

मोबाईल सेवा उत्तरेत हंडवारा आणि कुपवाडा वगळता अजूनही बंदच आहे, तर इंटरनेट सेवा संपूर्ण खोºयात अद्यापही बंद आहे. योग्य वेळी इंटरनेट, तसेच मोबाईल सेवा विशेषत: लीजड लाइन्स आणि बीएसएनएल ब्रॉडबँड सुरू करण्याचा विचार करतील. (वृत्तसंस्था)

संवेदनशील ठिकाणी सुरक्षादले तैनात
काश्मीर खोºयात देशविरोधी तत्त्वे हिंसाचार भडकवण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेट सेवांचा गैरवापर करतील, अशी अधिकाºयांना भीती आहे. संपूर्ण खोºयात कुठेही बंधने नाहीत; परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत.
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश ५ आॅगस्ट रोजी निर्माण केले. त्या दिवसापासून पहिल्यांदा संपूर्ण काश्मीरमध्ये निर्बंध लागू केले गेले होते. खोºयात टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवले गेले.

Web Title: Normal transactions in the Kashmir Valley are disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.