पुरीभाजीमध्ये आढळले मांसाहारी पदार्थ लातूरच्या संजय क्वॉलिटी रिफ्रेशमेंटमधील घटना : अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविले, हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 26, 2015 23:38 IST2015-07-26T23:38:24+5:302015-07-26T23:38:24+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या शेजारील एका हॉटेलमध्ये पुरीभाजीमध्ये मांसाहारी पदार्थ आढळल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात हॉटेलचालकाविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी या प्रकरणी अन्न पदार्थांचे नमुने अन्न औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत़

पुरीभाजीमध्ये आढळले मांसाहारी पदार्थ लातूरच्या संजय क्वॉलिटी रिफ्रेशमेंटमधील घटना : अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविले, हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
ल तूर : जिल्हा परिषदेच्या शेजारील एका हॉटेलमध्ये पुरीभाजीमध्ये मांसाहारी पदार्थ आढळल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात हॉटेलचालकाविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी या प्रकरणी अन्न पदार्थांचे नमुने अन्न औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत़ याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लातूरच्या जिल्हा परिषद शेजारील शाम नगर भागात असलेल्या संजय क्वॉलिटी रिफ्रेशमेंट या शाकाहारी हॉटेलमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रामराव भोसले हे नाष्टा करण्यासाठी रविवारी गेले होते़ त्यांच्या पुरीभाजीच्या प्लेटमध्ये हाडे व मांसाहारी पदार्थ आढळल्याची तक्रार त्यांनी केली़ ही माहिती कळताच घटनास्थळी शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तय्यबअली शेख दाखल झाले़ त्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने पुरीभाजीचे अन्न नमुने व हॉटेलमधील अन्य काही पदार्थांचे नमुने तपासणीसाठी अन्न प्रशासनाकडे पाठविले़ यावेळी हॉटेल परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती़ याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख बालजी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हॉटेलचालक संजय सावंत यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुरनं २०५/१५ कलम २७२ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील तपास पोउपनि तय्यबअली शेख करीत आहेत़